Tanker water to six wadis | सहा वाड्यांना टॅँकरने पाणी

सहा वाड्यांना टॅँकरने पाणी

चांदवड : उन्हाच्या झळा जसजशा वाढू लागल्या आहेत तसतशी तालुक्यात पाणीटंचाई सुरू झाली असून, तालुक्यातील सहा वाड्यांमध्ये दररोज ०२ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा जलयुक्त शिवार योजनेची कामे व पाऊस बऱ्यापैकी झाल्याने फारशी पाणीटंचाई जाणवली नसली तरी मे महिन्याच्या शेवटी चांदवड तालुक्यातील बºयाच गावावर विहिरी, बोअरवेल, जलसाठे शेवटची घटका मोजत आहेत. पाणी कमी पडल्याने बºयाच भागात पाणी टंचाईची तीव्रता वाढली. आता पाऊस कधी पडेल याकडे सर्वांक़्हे लक्ष लागले आहे.
चांदवड तालुक्यातील सहा वाड्यांना दोन खाजगी टॅकरने पाणी पुरवठा महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या जलकुंभावरुन करीत असल्याची माहिती गटविकास अधिकारी महेश पाटील व पाणीपुरवठा अधिकारी सी. जे. मोरे यांनी दिली.
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील वाघाडवस्ती (कोंबडवस्ती), दरेगाव येथील गिरणारे वाटेवरील देवरे वस्ती, वाद येथील हरपडे खताळवस्ती, कानडगाव येथील जगताप वस्ती व कानडगाव येथील पाणपोई वस्ती अशा सहा वाड्यांना दोन खासगी टॅकरने महाराष्टÑ जीवन प्राधिकरणाच्या मनमाड-लासलगाव रोडवरील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो आता जून महिना लागला असून केव्हा पाऊस पडेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर पाऊस सुरू होउउन जलसाठ्यांमध्ये वाढ होईपर्यंत टॅँकरचे प्रस्ताव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, शेतकर्यांना खरीप हंगामाचे वेध लागले असून, हा हंगाम पावसावरच अवलंबून आहे. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त असून, पाण्याच्या नियोजनात अडकले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-------------------------------
यंदा मात्र कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी पाणीटंचाईकडे फारसे लक्ष दिले नाही. कारण सर्वत्र कोरोनाची भिती मनात असल्याने प्रत्येक जण घरात बसूनच आपला बचाव करतांना दिसत असल्याने यंदा पाणीटंचाईची आरडाओरड फारसी झाली नसल्याचे सध्यातरी चित्र चांदवड तालुक्यात दिसत आहे.

Web Title: Tanker water to six wadis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.