Tanker crossing the district in the district! | जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!
जिल्ह्यात टॅँकरचे त्रिशतक पार!

नाशिक : उन्हाचा वाढता तडाखा व पाण्याच्या मागणीत झालेली वाढ पाहता, जिल्ह्यात टंचाईग्रस्त गावांची संख्या एक हजाराहून अधिक पोहोचली असून, त्यासाठी सव्वातीनशे टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षांनंतर पहिल्यांदाच जिल्ह्णात विक्रमी संख्येने टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली असून, मान्सूनचे यंदा उशिराने आगमन होणार असल्याने ही संख्या चारशेच्या आसपास पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर टंचाईच्या झळा अधिकच तीव्र होऊ लागल्या आहेत. धरण प्रकल्पांतही अवघा १० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांना पिण्यासाठी टँकरवरच अवलंबून राहावे लागत आहे. डिसेंबर अखेरपासूनच जिल्ह्णात टँकर सुरू करण्यात आले. टंचाई परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनीही संपूर्ण राज्याचा आढावा घेत दुष्काळी उपाययोजना राबविताना मागणी आल्यास तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्यात आली असली तरी, जिल्ह्णात एकही पाणीपुरवठा योजना सुरू होऊ शकलेली नाही. त्यामुळे सध्या टंचाई निवारणासाठीही प्रशासनाने टँकरवरच भर दिल्याचे दिसून येते. टँकर मंजुरीचे अधिकार प्रांतस्तरावर देण्यात आल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येते. जिल्ह्णातील २१० गावे, ८५९ वाड्या अशा १ हजार ६९ गावांना ३२५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यात २२ शासकीय आणि ३०३ खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक ६९, सिन्नर तालुक्यात ६१ टँकर सुरू आहेत. टँकरच्या ८३५
फेऱ्या मंजूर असून, प्रत्यक्षात ७५७ फेºया सुरू आहेत. आठवडाभरापूर्वी २९२ टँकर सुरू होते. त्यात वाढ होत आता संख्या सव्वातीनशेच्या घरात पोहोचली आहे.
तालुकानिहाय टँकरची संख्या
बागलाण ३८, चांदवड १४, दिंडोरी १, देवळा १५, इगतपुरी १०, मालेगाव ४९, नांदगाव ६९, सुरगाणा ७, पेठ ३, सिन्नर ६१, त्र्यंबक ७, येवला ५१ इतके टॅँकर सुरू आहेत, तर ग्रामीण भागात पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाने २१० खासगी विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. त्यात बागलाण २०, दिंडोरी ११, देवळा २३, इगतपुरी १०, कळवण ३७, मालेगाव ४५, नांदगाव १९, निफाड २, पेठ २६, सुरगाणा ५, सिन्नर ३, येवला ९ या विहिरींचा समावेश आहे.


Web Title:  Tanker crossing the district in the district!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.