टॅँकर माफियांना लागणार चाप
By Admin | Updated: February 25, 2015 00:34 IST2015-02-25T00:34:22+5:302015-02-25T00:34:54+5:30
टॅँकर माफियांना लागणार चाप

टॅँकर माफियांना लागणार चाप
नाशिक : सातत्याने टॅँकर होणारा कोट्यवधींचा खर्च यंदाच्या टंचाई कृती आराखड्यात घटला असून, २२ कोटी ६२ लाखांंचा टंचाई कृती आराखडा या टॅँकरच्या संख्येत ‘लक्षणीय’ घट झाल्याने १३ कोटी ९९ लाखांवर आला आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या टॅँकर माफियांचा टॅँकर वाढविण्यासाठी प्रशासनावर वाढता दबाव असला तरी प्रामुख्याने विंधनविहिरींची दुरुस्ती व खासगी विहिरींचे अधिग्रहण यावरच प्रशासनाने जास्त लक्ष केंद्रित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील वर्षी टंचाई कृती आराखड्याच्या तिसऱ्या टप्प्यात १९७ टॅँकर लावण्यात आल्या होत्या, तर २०१३ या वर्षात याच टॅँकरची संख्या ३३९ इतकी होती. यावर्षी मात्र ही संख्या शंभराच्या आसपास मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. टंचाई कृती आराखड्यात नऊ प्रकारच्या विविध उपाययोजना राबविण्यावर पाणीपुरवठा विभागाचा भर असून, त्यात प्राधान्यक्रमानुसार प्रगतिपथावरील अपूर्ण पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्याचे ठरविले असून, जिल्'ात एकूण ७६ अपूर्ण पाणीपुरवठा योजनांपैकी ६० गावे व १६ वाड्यांचा समावेश असून, त्यातील ४० अपूर्ण पाणीपुरवठा झाल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये विंधनविहीर मंजुरीच्या कार्यक्रमात २७६ विंधनविहिरी मंजुरीचे प्रस्ताव तयार करण्यात आले असून, त्यापैकी १०४ विंधनविहिरींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहे.