तळवाडे भामेर कालव्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:02 PM2020-09-28T23:02:57+5:302020-09-29T01:19:49+5:30

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर ...

Talwade falls into Bhamer canal | तळवाडे भामेर कालव्याला गळती

तळवाडे भामेर कालव्याला गळती

googlenewsNext
ठळक मुद्देअनर्थ टळला : पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम, प्रशासनाकडून उपाययोजना

सटाणा : बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण २५वर्षानंतर पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणावर वाहून जात असल्याचे स्थानिक नागरिकांना आढळून आल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने तात्पुरती उपाययोजना केल्याने मोठा अनर्थ तूर्तास टळला असला तरी पावसाचा जोर वाढल्यास धोका कायम असल्याचे सांगितले जात आहे.
बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील ४५ दलघफू क्षमता असलेले धरण १९९४ नंतर पहिल्यांदा पूर्ण क्षमतेने भरले. मात्र धरणाच्या बांधाखालून गढूळ पाणी मोठया प्रमाणात वाहू लागल्याने धरण फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिकांनी हा धोका ओळखून आमदार दिलीप बोरसे यांना याबाबत माहिती दिली असता बोरसे यांनी प्रांत विजय भांगरे, तहसीलदार जितेंद्र इंगळे,जलसंपदा विभागाचे अभियंता अभिजित रौदळ,शाखा अभियंता वाय जी पगार,पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जितेंद्र कोल्हे आदींनी घटनास्थळी धाव घेत पॉकलँड मशीनव्दारे तातडीची उपाययोजना करत सांडवा मोठा केला.धरणातील पाणी कमी करून संभाव्य धोका टाळण्यासाठी अधिकाऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले असून धरण फुटल्याची शोशल मिडियावर अफवा पसरल्याने धरण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

तळवाडे धरण फुटण्याची शक्यता आहे. यामुळे मोठे नुकसान होणार असल्याचा फोन आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ प्रशासनाच्या अधिका?्यांशी संपर्क साधून घटनास्थळी गेलो. पोकलँड मशीन उपलब्ध करून सांडव्यातून वाढीव पाणी काढून धरण फुटण्याचा धोका कमी झाला असून पुढील काम देखील युद्धपातळीवर सुरू आहे.- दिलीप बोरसे, आमदार

तळवाडे धरण १९९४ नंतर प्रथमच पूर्णक्षमतेने भरले आहे.वेळोवेळी पाणी लिकेज होऊ नये म्हणून त्याची देखभाल दुरुस्ती होणे गरजेचे होते. परंतु या धरणाच्या क्षेत्रात पाऊस कमी असल्याने त्याच्याकडे जलसंधारण विभागाचे दुर्लक्ष झालेले होते. धरणाला धोका निर्माण होऊन काही कमी-जास्त घडले तर याची जबाबदारी कोणाची?
-अभिमन पगार, सामाजिक कार्यकर्ते, उत्राने.  

 

Web Title: Talwade falls into Bhamer canal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.