कसबे सुकेणेत लॉकडाउनचा तालुका प्रशासनाकडून आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 23:31 IST2020-04-25T23:31:36+5:302020-04-25T23:31:47+5:30
कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि लष्करी जवानांनी सुरू केलेल्या बंदोबस्तासह गावातील परिस्थितीची निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्या.

कसबे सुकेणेत लॉकडाउनचा तालुका प्रशासनाकडून आढावा
कसबे सुकेणे : कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी कसबे सुकेणे, मौजे सुकेणे येथे सुरू असलेल्या लॉकडाउन आणि लष्करी जवानांनी सुरू केलेल्या बंदोबस्तासह गावातील परिस्थितीची निफाडचे तहसीलदार दीपक पाटील व आमदार दिलीप बनकर यांनी पाहणी करत स्थानिक प्रशासनाला विविध सूचना केल्या.
कसबे सुकेणे येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेला लॉकडाउनच्या बंदोबस्त आणि परिसरातील परिस्थितीचा आढावा तहसीलदार दीपक पाटील यांनी घेतला. कसबे सुकेणे येथील जवान गावाकडे सुट्टीवर आल्यानंतर कोरोनाच्या लढाईत स्वयंस्फूर्तीने बंदोबस्त करीत आहे. ही बाब प्रशासनाला कोरोनाच्या लढाईत आत्मविश्वास वाढविणारी असल्याचे सांगून तहसीलदार पाटील यांनी सर्व जवानांचे कौतुक करीत स्थानिक गटविकास अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांना सूचना केल्या. सरपंच गीता गोतारणे, उपसरपंच अतुल भंडारे आदी उपस्थित होते.
दरम्यान, शहरातील नाकाबंदीत खडा पहारा देणाऱ्या लष्करी जवानांना कसबे सुकेणे येथील कुबेर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेतर्फेशीतपेयांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी अध्यक्ष विजय औसरकर, डॉ. रवींद्र जाधव, उपाध्यक्ष विपुल करंजकर, संचालक बाळासाहेब मत्सागर, राजेश भार्गवे, ललित गांधी, व्यवस्थापक गोविंद जाधव आदी उपस्थित होते.