तळेगाव अत्याचार; दोषारोपपत्र दाखल
By Admin | Updated: October 28, 2016 02:05 IST2016-10-28T01:49:39+5:302016-10-28T02:05:05+5:30
महिनाभरात खटल्याच्या कामकाजाला होणार सुरुवात

तळेगाव अत्याचार; दोषारोपपत्र दाखल
नाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेगावमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणाचा पोलीस तपास पूर्ण झाला असून जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष सरकारी वकील अॅड. अजय मिसर यांनी ३२५ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
शनिवारी (दि. ८) संध्याकाळी तळेगावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती.
या घटनेचे पडसाद संपूर्ण जिल्ह्णात उमटून कायदासुव्यवस्था धोक्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ रास्ता रोकोआंदोलन करण्यात आले होते़ ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अवघ्या १९ दिवसांत या प्रकरणाचा तपास पूर्ण केला आहे़ पोलिसांनी या दोषारोपपत्रावर मार्गदर्शन घेतल्यानंतर बुधवारी ते न्यायालयात सादर करण्यात आले.