तळीरामांनी वळविला खेड्यांकडे मोर्चा
By Admin | Updated: May 8, 2017 01:00 IST2017-05-08T01:00:10+5:302017-05-08T01:00:39+5:30
तळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या बिअर बारवर मद्यविक्री बंद झाल्याने तळीरामांनी मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे

तळीरामांनी वळविला खेड्यांकडे मोर्चा
!लोकमत न्यूज नेटवर्क
तळवाडे दिगर : उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तसेच शहरातील बिअर बारवर मद्यविक्री बंद
झाल्याने तळीरामांनी आपला मोर्चा आता खेड्यांकडे वळवला आहे.
तळवाड्यात गावठी दारूसोबतच देशी-विदेशीचे सर्वच ब्रँड सर्रासपणे विकले जात असल्याची चर्चा सुरू असल्याने आजूबाजूच्या खेड्यावरून येणाऱ्या ‘मद्यपी पाहुण्यां’ची वर्दळ वाढल्याने गावकऱ्यांकडून मद्यविक्री थांबविण्याची मागणी केली जात आहे.
मागील काही वर्षांपासून थंड पेयच्या नावाखाली ‘सर्व’च पेय काही टपऱ्यांवर अवैधरीत्या सर्रासपणे विकले जात आहेत.
विशेष बाब म्हणजे मद्यपींची संख्याही दिवसेंदिवस वाढतच गेली असून, वयस्करांपेक्षा तरुण व अल्पवयीन मुलांचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे विदारक चित्र बघावयास मिळत आहे.
सदर बाब भावी पिढीसाठी अत्यंत गंभीर असून, आई-वडिलांना चिंतन करावयास लावणारी
आहे. सध्या सुट्यांचे दिवस असल्याने वारकरी संप्रदायामार्फत गावातील तसेच परिसरातील बालगोपाळांसाठी व्यसनमुक्ती प्रचारक कृष्णा रौंदळ यांच्या मार्गदर्शनाने बालसंस्कार केंद्र चालवले जात असून, शेजारीच असलेल्या ग्रामपंचायतीच्या आवारात काही मद्यपी दारूच्या बैठकीसाठी अंधाराची वाट पाहत असल्याचे चित्र पाहावयास
मिळते.
मद्यविक्रीच्या बाबतीत महिलांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष धुसफुसत असून, असंतोषाची ठिणगी पडण्याआधीच ग्रामपंचायतीने पोलिसांच्या मदतीने अवैध दारूविक्र ी तत्काळ बंद पाडावी व गाव व्यसनमुक्त करावे, असे ज्येष्ठ नागरिकांकडून बोलले जात आहे.