शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

लग्नसराईचा फायदा घेत महिनाभरात २५ दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:44 IST

पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविल्या.

ठळक मुद्दे पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरी मंगल कार्यालये, लॉन्सच्या आवारातील वाहनतळांमधून दुचाकी पळवून नेल्या

नाशिक : लग्नसराईच्या काळात नाशिककरांच्या दुचाकींवर चोरट्यांनी चांगलाच डल्ला मारला. एप्रिल महिन्यात तब्बल २५ दुचाकी शहर व परिसरातून चोरट्यांनी पळविल्या. तसेच अर्धा डझन घरे फोडून दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केली. मागील महिन्यात विवाहसोहळे मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये पार पडले. याचा फायदा घेत चोरट्यांनी विविध मंगल कार्यालये, लॉन्सच्या आवारातील वाहनतळांमधून दुचाकी पळवून नेल्या आहे.शहर परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आयुक्तांकडून विविध प्रयत्न केले जात आहे. कोम्बींग आॅपरेशन, मिशन आॅल आऊट, नाकाबंदी यांसारख्या मोहिमा त्याचाच एक भाग आहे; मात्र पोलीस आयुक्तालय हद्दीतील तेरा पोलीस ठाण्यांमध्ये दुचाकी चोरीचे प्रमाण मागील महिन्यात अधिक राहिले. सरासरी दिवसाकाठी एक याप्रमाणे महिनाभरात २५ दुचाकी चोरट्यांनी पळविल्याची नोंद पोलिसांकडे आहेत. सर्वाधिक अर्धा डझन दुचाकी नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरट्यांनी लांबविल्या. तसेच याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरात तीनवेळा खूनाचा प्रयत्न झाल्याच्या घटनाही घडल्या असून दोन महिलांचा विनयभंग तर एक बलात्काराचाही गुन्हा पोलीस ठाण्याच्या दप्तरी आहे. पंचवटी पोलीस ठाणे हद्दीतून चार दुचाकी चोरी झाल्या. तसेच एका महिलेचा बलात्कारदेखील झाल्याची नोंद या पोलीस ठाण्यात आहेत. शहरातील आडगाव, देवळाली कॅम्प, नाशिकरोड, भद्रकाली, अंबड, उपनगर अशा प्रत्येक पोलीस ठाण्यात महिलेचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी मागील महिन्यात दाखल आहेत. तब्बल दहा महिलांचा संशयितांनी विनयभंग केला. मागील महिन्यात आदर्श आचारसंहिता सुरू असताना शहरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत होत्या हे विशेष! निवडणूक काळात कुठल्याहीप्रकारे कायदासुव्यवस्था धोक्यात आली नाही व मतदानप्रक्रियादेखील सुरळीत शांततेत पार पडली असली तरी मागील महिन्यात दुचाकी चोरी, घरफोडी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, विनयभंग, बलात्कारसारखे गुन्ह्यांचे प्रमाण अधिक राहिल्याचे पोलीस ठाण्यांच्या दप्तरी असलेल्या आकड्यांवरून स्पष्ट होते.

टॅग्स :NashikनाशिकtheftचोरीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी