गावासाठी पाणी पुरवठा करणारा टेकेश्वर बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 22:22 IST2019-04-03T22:21:59+5:302019-04-03T22:22:23+5:30
अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता. नंतर बंधारा ...

गावासाठी पाणी पुरवठा करणारा टेकेश्वर बंधारा
अंदरसुल : अंदरसुल ग्रामपंचायतचा टेकेश्वरी येथील पाणीपुरवठा बंधारा पालखेड डाव्या कॅनॉलच्या प्रासंगिक आरक्षणाच्या पाण्याने भरण्यात आला होता.
नंतर बंधारा संपूर्ण भरल्यानंतर फोडण्यात पण आला होता, तरीही अंदरसुलच्या ग्रामस्थानी सलग चार-पाच तास मेहनतीने व मशिनरींच्या साह्याने फुटलेला बंधारा संपूर्णपणे दाबून बंदिस्त केला, आणि ओहोटीच्या पाण्याने पुन्हा संपूर्ण भरला त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहीरीला भरपूर पाणी वाढले व अंदरसुल गावातील नळांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले.
पण तालुक्यातील पूर्व भागातील गावांना येवला नगरपालिकेच्या साठवण बंधाऱ्याच्या जवळील विहिरीवरु न पाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत होता. तालुक्यातील इतर भागातील टँकर पण त्याच ठिकाणी टँकर भरायला येतात, त्यामुळे तिथे टँकरची लाईन लागायची व प्रत्येक टँकरची एक खेप होणे दुरापास्त होत असे.
शिवाय अंतर पण वाढतअसे हे येवला पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अन्सार शेख यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अंदरसुल ग्रामपंचायत सरपंच विनिता सोनवणे व ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्याशी संपर्ककरत सदरच्या पाणी पुरवठा विहिरीवरु न येवला तालुक्यातील पूर्व भागातील टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर भरु न देण्यासाठी विचारणा केली असता तात्काळ अंदरसुल ग्रामपंचायत प्रशासनाने होकार कळवुन ग्रामपंचायतच्या सोलर वॉटरपम्पद्वारे टँकर भरून देण्याची तयारी दर्शविली.
त्याप्रमाणे अंदरसुल ग्रामपंचायतच्या प्रशासनाने रोज चार टँकरद्वारे प्रत्येकी दोन असे आठ टँकर भरु न देत आपल्या आजुबाजुच्या खेड्यातील बांधवांना पाणी उपलब्ध करून दिले आहे.
(फोटो ०३ अंदरसुल २)