नांदगावी बीएसएनएल सेवेचा बोजवारा

By Admin | Updated: May 6, 2017 01:14 IST2017-05-06T01:13:55+5:302017-05-06T01:14:20+5:30

नांदगाव : बीएसएनएल मोबाइल सेवेचा बोजवारा उडाला असून, ग्राहक त्रस्त झाले आहेत.

Takeover of BSNL service in Nandgavi | नांदगावी बीएसएनएल सेवेचा बोजवारा

नांदगावी बीएसएनएल सेवेचा बोजवारा

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदगाव : बीएसएनएल मोबाइल सेवेचा बोजवारा उडाला असून, ग्राहक त्रस्त झाले आहेत. स्थानिक अधिकारी ‘आमच्या हातात काहीच नाही’, असे सांगून टोलवाटोलवी करत आहेत. रेंज गायब होणे, या मार्गावरील लाइन्स व्यस्त आहेत या संदेशाची ध्वनिमुद्रित टेप वारंवार कॉल करण्याचा प्रयत्न केल्यानंतर वाजत राहणे, एकच नंबर दोनदा तीनदा लावल्यानंतर
लागणे, तोही मध्येच कट होणे, नेट सुरू असेल तर फोन आउट आॅफ कव्हरेज असणे अशा अनेक समस्यांमुळे ग्राहकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.
केंद्र सरकार डिजिटायझेशनच्या आधुनिकतेचा डांगोरा पिटत असले तरी त्यांच्या अखत्यारित काम करणाऱ्या बीएसएनएलसारख्या कंपन्या मात्र निर्भेळ आधुनिक सेवा देण्यात कमी पडत आहेत, अशी तक्र ार ग्राहक करत आहेत. भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी या प्रकरणी निवेदनाद्वारे लक्ष वेधले असून, बीएसएनएलच्या उच्च अधिकाऱ्यांनी तातडीने समस्यांचे समाधान करावे, अशी मागणी केली आहे.

Web Title: Takeover of BSNL service in Nandgavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.