शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

चोरीसाठी नेले आणि मित्राचा गळा आवळून काटा काढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 00:52 IST

शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता.

इंदिरानगर : शीर नसलेला एका अल्पवयीन मुलाचा मृतदेह इंदिरानगर पोलीस ठाणेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगरच्या मोकळ्या मैदानातील विहिरीत सोमवारी (दि.११) आढळून आला होता. या मृतदेहाची अखेर शरीरावरील पॅन्टवरून मुलाच्या आई-वडिलांनी ओळख पटविली असून, पोलिसांनी मुलाच्या खूनप्रकरणी मयताच्या तिघा जुगारी मित्रांना संशयित गुन्हेगार म्हणून मंगळवारी (दि.१२) ताब्यात घेतले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राजीवनगर झोपडपट्टीतून सोळावर्षीय मुलगा रामेश्वर मनोहर कावले हा दोन महिन्यांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याचा भाऊ विकास मनोहर कावले (२३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार नोंद करण्यात आली होती.दरम्यान, सोमवारी येथील विक्रम पेठे यांच्या मळ्यातील एका विहिरीत अनोळखी मुलाचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले. शीर नसल्यामुळे ओळख पटविणे अवघड झाले होते. पोलिसांनी कौशल्याचा वापर करत तातडीने तपासाला गती दिली. मृतदेहाच्या अंगावरील पॅन्ट, कमरेचा पट्टा यावरून राजीवनगर भागात विचारपूस सुरू केली. यावरून मयत व्यक्ती हा बेपत्ता झाालेला रामेश्वर असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्या भावाद्वारे मृतदेहाची ओळख पटविण्यास यश मिळविले. याप्रकरणी रामेश्वरच्या अल्पवयीन तिघा चोर मित्रांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण, आबा पाटील, दत्तात्रय पाळदे, अखलाख शेख, संदीप लांडे, रियाज शेख, जावेद खान आदींनी सहभाग घेत अवघ्या बारा तासांत गुन्हे शोध पथकाने छडा लावला.जुगारात हरलेल्यादीड लाखामुळे हत्यारामेश्वर हा संशयित तिघा मित्रांकडून जुगारात दीड लाख रुपये जिंकला होता. त्यांच्याकडून त्याला रक्कम घेणे बाकी होते, म्हणून तो सातत्याने त्यांच्यावर दबाव वाढवित होता. त्याच्या दबावाला कंटाळून २० सप्टेंबर २०१९ रोजी त्याला मध्यरात्री तिघांनी घराबाहेर काढून ठार मारल्याचे उघडकीस आले आहे.मित्रांनीच केला विश्वासघातभंगार चोरीसाठी संशयित तिघे मित्र रामेश्वरला मध्यरात्री घरातून घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितले. चौघे रेशिंग मैदानावर चोरीसाठी आले असता तेथील वॉचमनने त्यांना बघितले. त्यामुळे चौघेही गवताच्या आडोशाला लपले. यावेळी त्याच्यासोबत असलेल्या तिघा मित्रांनी रामेश्वरचा खून करण्याचा कट तत्काळ रचला. सोबत असलेल्या नायलॉनच्या दोरीने गवतामध्येच त्याचा गळा तिघांनी आवळला आणि दोरीला मोठा दगड बांधून विहिरीत रामेश्वरचा मृतदेह फेकून दिल्याची कबुली तिघांनी दिली.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिस