शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

टाकेदला अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 19:06 IST

सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली.

ठळक मुद्देतब्बल सात दिवस ज्ञानेश्वरी महिला पारायण

सर्वतिर्थ टाकेद : प्रभु रामचंद्रांनी वास्तव्य केलेल्या व सर्वतीर्थाचे माहेर घर असलेल्या टाकेद येथे आयोजित ५२ वा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला. या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी गावातून दिंडी काढून करण्यात आली.गावातील प्रेमनगर, इंदिरानगर, तेली गल्ली, धादवड गल्ली, परदेशी गल्ली, शनी मंदिर चौक या परिसरातून दिंडी काढण्यात आली होती. टाळ मृदंगाच्या तालावर हरी नामाच्या जयघोषात अवघे टाकेद ग्रामस्थ तल्लीन झाले होते. कोणी फुगडी खेळत, तर कोणी हरिनामाच्या गजरात तल्लीन होऊन टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरत नाचत होते.या दिंडीने गाव प्रदक्षिणा सुरुवात होताच महिलांनी रस्त्यावर प्रत्येक दारासमोर सडा, रांगोळी काढत ठिकठिकाणी या दिंडीचे स्वागत केले. या दिंडीत महिला, ज्ञानेश्वरी पारायण, तुळशी वृंदावन, बाळ गोपाळ यांच्यासह भाविक, वारकरी ग्रामस्थ सामील होते.गाव प्रदक्षिणा पूर्ण होताच मारुती मंदिर चौकात या सप्ताहाच्या मुख्य ठिकाणी आल्यानंतर या चौकात दरवर्षी प्रमाणे मोठे रिंगण करण्यात आले. या रिंगणात टाकेद येथील जेष्ठ प्रवचनकार प्रकाश महाराज कदम यांनी महिलेचे रूप धारण करून महिलेची वेशभूषा परिधान करून 'आईचा जोगवा मागेन' हे मनोरंजक हास्यमय भारुड सादर केले. त्यानंतर सत्वर पाव ग मला भवानी आई, खेळू फुगडी बाई, खेळू भवरा बाई, नवरा नको ग बाई ही भारुडं झाली. व टाळ मृदंगाच्या तालावर हा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला.दिंडी भारुड कार्यक्रमानंतर दही हंडी कार्यक्रम झाला. यानंतर या भव्य अखंड हरिनाम सप्ताहाची महाप्रसाद महापंगत भास्कर जाधव व गोविंद जाधव यांनी दिली. तब्बल सात दिवस ज्ञानेश्वरी महिला पारायण व आठ दिवस, दिवस रात्र विणा पूजा अर्चा सेवा अखंडित चालू होती. या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी टाकेद सह बांबळेवाडी, घोडेवाडी, शिरेवाडी सह परिसरातील विविध गाव, वाड्या वस्त्यांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत हा अखंड हरिनाम सप्ताह उत्साहात संपन्न झाला.

टॅग्स :SocialसामाजिकTempleमंदिर