शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

वस्तीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करा ; मराठा क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2018 16:23 IST

नाशिक : मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले.  वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच जिल्हाभरासह संपूर्ण शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक ...

ठळक मुद्देवसतीगृहाच्या जागेला विरोध करणारांवर कारवाई करामराठा क्रांती मोर्चाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनसमाजाला डिवचण्यासाठी जागेला विरोध, मराठा मोर्चाचा आरोप

नाशिक :मराठा क्रांती मोर्चाच्या नाशिक जिल्हा समन्वयकांनी वस्तीगृहाच्या जागेला होणाºया विरोधाविषयी जिल्हाधिकाऱ्यांना सोमवारी (दि. २०)निवेदन दिले.  वसतीगृहाला विरोध करून मराठा समाजाला डिवचून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या प्रवृतींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. तसेच जिल्हाभरासह संपूर्ण शहरात मराठा क्रांती मोर्चाच्या ठोक आंदोलनादरम्यान  आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हेही मागे घेण्याच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना निवेदन दिले. गेल्या चाळीस वर्षापासून सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनाला यश येत असताना काही समाजविघातक प्रवृत्ती विरोधाची भूमिका घेऊन शांततेच्या मानिसकतेत असलेल्या मराठा समाजाच्या सहनशक्तीला आव्हान देत सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न करीच असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी केला आहे. अशा नाठाळ प्रवत्ती जाणीवपुर्वक मराठा समाजाच्या अस्मितेला डिवचून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा कुटीलपणा करीत असल्याचेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मराठा समाजाला अथक प्रयत्नांनतर मिळालेले वस्तीगृह हिरावून घेण्याचा यामागे डाव खेळला जात असल्याचे वस्तीगृहाच्या जागेला होत असल्याच्या विरोधातून समोर येत आहे. सरकारने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी गंगापूर रोडवरील भुखंड मंजूर केला आहे. ही बाब सहन न झालेल्या काही प्रवृत्तींनी या जागेवर वस्तीगृह बांधण्यास विरोध दर्शविला आहे. त्यापार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या समाज विघातक प्रवृत्तींचा कायदेशीर मार्गाने बंदोबस्त करून वस्तीगृह बांधकामाला गती द्यावी अशी मागणी केली आहे. यावेळी मराठा क्रांती मोर्चातर्फे करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, विलास जाधव,संदीप लभडे,मदन गाडे, माधवी पाटील, पूजा धुमाळ, अनुपमा पाटील, ज्ञानेश्वर जाधव,ज्ञानेश्वर भोसले,अ‍ॅड. निलेश संधान,विकास काळे,आप्पासाहेब गाडे,निलेश पाटील आदी उपिस्तत होते.  

टॅग्स :marathaमराठाNashikनाशिकMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाagitationआंदोलन