शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
4
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
5
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
6
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
7
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
8
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
9
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
10
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
11
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
12
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
13
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
14
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
15
९० वर्षीय वृद्धेच्या मानहानी दाव्यावर थेट २० वर्षांनी २०४६ मध्ये सुनावणी; हायकोर्टात काय घडलं?
16
नेदरलँडवरून कुरियरने विनाअडथळा उल्हासनगरमध्ये पोहोचले पार्टी ड्रग्ज; नायजेरियन टोळीचे कनेक्शन
17
ठाण्यातील १०० एकरच्या TDR ला अखेर स्थगिती, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; २,८०० कोटींचा व्यवहार रखडला
18
दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी ९ ते २१ मे दरम्यान परीक्षा; ४ लाख ९२ हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार
19
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
20
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांच्या कार्यातून स्फूर्ती घ्यावी

By admin | Updated: March 11, 2015 00:06 IST

शिवराज गोले : शिवनेरी ग्रुपतर्फे शिवजयंतीनिमित्त व्याख्यान

नाशिकरोड : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यातून आपण स्फूर्ती घेतली पाहिजे. माय मराठी वाचविण्यासाठी प्रत्येकाने मराठी वाचनाची गोडी लावा, मराठीची गोडी आपल्या कुटुंबापासून सुरू करा, असे प्रतिपादन लेखक शिवराज गोले यांनी केले. भारत प्रतिभूती व चलार्थ पत्र मुद्रणालयातील शिवनेरी ग्रुपतर्फे भारत प्रतिभुती मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारासमोर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ‘जगण्याची कला-५१ सूत्रे’ या विषयावर बोलताना गोले म्हणाले की, महाराजांसारखे स्वाभिमानाने जगण्याचे शिका, शब्दात ताकद असते तो माणूस जोडतो पण तोडतोही. संवादाची साधने वाढली परंतु प्रत्येकामधील संवाद कमी झाल्याचे गोले यांनी सांगितले. ज्या कामात आनंद आहे ते काम करा, त्यात यश आहे. यश पैशात मोजता येत नसून, ते आनंदात, माणुसकीमध्ये असते. प्रेम, समाधान, जिव्हाळा, मैत्री, शांती, आनंद या गोष्टी पैशाने मिळत नाहीत. आनंद, विनोद आपल्या अंतरंगातून आले पाहिजेत, असे गोले यांनी स्पष्ट केले. प्रारंभी कामगार नेते जगदीश गोडसे, रामभाऊ जगताप, ज्ञानेश्वर जुंद्रे, अशोक गायधनी, प्रकाश पगारे, माधव लहांगे, गोकुळ काळे आदिंच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी अशोक सुजगुरे, तानाजी कोठुळे, किरण गांगुर्डे, संपत कडलग, मोहन मते, भूषण मेढे, दीपक आंबेकर, रामदास हिरे, नाना पाळदे, रंगनाथ शिरसाठ आदिंसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)