वाढत्या उष्णतेने आरोग्याची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2019 00:18 IST2019-05-01T00:18:28+5:302019-05-01T00:18:58+5:30

सध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे.

 Take care of the health of rising heat | वाढत्या उष्णतेने आरोग्याची काळजी घ्यावी

वाढत्या उष्णतेने आरोग्याची काळजी घ्यावी

एक्सपर्ट व्ह्यू

सध्या नाशिक शहराचे तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने उकाड्यामुळे आबालवृद्धांना मोठा त्रास होत आहे. विशेषत: गर्भवती महिलांना कडकाच्या उन्हामुळे घरातदेखील अस्वस्थ वाटते. त्यामुळ सर्वांनीच उन्हापासून स्वत:चे संरक्षण करण्याची गरज आहे.
वाढत्या तापमानामुळे अतिसार, उलटी, डोकेदुखी, अचानक घाम येणे, तोंडाला कोरड पडणे, चक्कर येणे असे प्रकार घडू शकतात. तसेच उष्माघातामुळे मनुष्याच्या जिवालादेखील धोका पोहचू शकतो. यासाठी तीव्र उन्हात शक्यतो बाहेर पडू नये. सकाळच्या वेळी ९ वाजेच्या आत घराबाहेरील कामे पूर्ण करावी किंवा सायंकाळच्या वेळी बाहेर पडावे.
तसेच कामानिमित्त दुपारी बाहेर पडावे लागले तर पूर्णपणे अंगावर कपडे घालावे, डोके पूर्ण झाकून घ्यावे, डोक्याला रुमाल बांधावा. शक्यतो सैलदार व पांढरे कपडे घालावेत. डोळ्यावर गॉगल लावावा. तसेच आरोग्याची काळजी घ्यावी.
दिवसातून साधारणत: ४ ते ५ लिटर पाणी प्यावे, त्याचप्रमाणे ताक प्यावे, कैरी आणि चिंचाचे पन्हे यांचे सेवन करावे. टरबूज, खरबूज आणि काकडी खावी, हलका आहार घ्यावा. उन्हाळ्यात जेवण फारसे जात नाही, परंतु शरीराला पचेल असे हलके अन्न घ्यावे. प्रत्येकाने उन्हाळ्यात कडक उन्हापासून आपल्या शरीराची व आरोग्याची काळजी घेतल्यास फारसा त्रास जाणवणार नाही. उष्माघाताची लक्षणे दिसताच त्यावर प्राथमिक उपचार केल्यास दाहकता कमी होते़   (लेखक : स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत)
थंड पाणी प्यावे
लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला यांनी उन्हात घराबाहेर पडू नये. उन्हात शरीराला घाम खूप येतो त्यामुळे थंड पाण्याने आंघोळ करावी. चेहरा व हातपाय थंड पाण्याने धुवावे. थंड पाणी प्यावे. चक्कर येत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तत्काळ डॉक्टराकडे जावे. घरात खेळती हवा राहू द्यावी, असे अनेक उपाय सांगता येतील
रुग्णांना त्रास
रुग्णाला कडाक्याच्या उन्हापासून दूर ठेवावे, रुग्णाच्या अंगावरील कपडे सैल करून त्याच्या अंगावर पाणी शिंपडावे, रुग्णाला मोकळ्या हवेत बसवून उन्हाच्या झळा बसणार नाहीत याची काळजी घ्यावी़

Web Title:  Take care of the health of rising heat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.