विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

By Admin | Updated: June 25, 2014 00:13 IST2014-06-25T00:01:01+5:302014-06-25T00:13:37+5:30

विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

Take action against traders who are not filled in the statement | विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा

 

नाशिक : एलबीटी रद्द होण्याच्या शक्यतेमुळे व्यापारी आणि उद्योजकांकडून वार्षिक विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. व्यापारी आणि उद्योजकांची नोंदणी २९ हजार इतकी असताना आत्तापर्यंत केवळ ३०० व्यावसायिकांनी विवरणपत्र भरले आहे. त्यामुळे महापालिकेला आता कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी करावी लागली आहे. येत्या रविवारपर्यंत एलबीटी न भरल्यास सोमवारपासून पाच हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. तसेच अगदीच टोकाला गेल्यास कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते.
एलबीटीतील तरतुदीनुसार महापालिकडे नोंदणी असलेल्या व्यापारी आणि व्यावसायिकांनी आर्थिक वर्ष संपल्यानंतर तीन महिन्यांच्या आता वार्षिक विवरणपत्र दाखल करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यातून खरोखरीच स्थानिक स्तरावर माल खरेदी केला का आणि अन्य व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला असेल तर त्यावर त्याने तरी एलबीटी भरला किंवा नाही याची पडताळणी होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या दृष्टीने हे महत्त्वाचे आहे. असे असताना एलबीटी रद्द करण्याच्या शक्यतेने व्यावसायिकांकडून थंड प्रतिसाद मिळत आहे. पालिकेकडे २९ हजार ५७६ व्यावसायिकांनी एलबीटीसाठी नोंदणी केली आहे. मात्र, विवरणपत्र भरण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक असताना ३०० व्यावसायिकांनीच विवरण पत्रे भरली आहेत. नियमानुसार २९ जूनपर्यंत मुदत असून त्यातील आता शेवटचे पाच दिवस शिल्लक आहेत. त्यातही चौथा शनिवार म्हणून २८ तारीख तर रविवारीदेखील सार्वजनिक सुटी आहे. तरीही या दिवशी एलबीटी विभाग सुरू ठेवून विवरणपत्र स्वीकारले जाणार आहे.
मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्या व्यावसायिकांना पाच हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे व्यावसायिकांनी वेळेत एलबीटी विवरणपत्र भरावे, असे आवाहन एलबीटी उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Take action against traders who are not filled in the statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.