तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 00:53 IST2021-09-17T00:51:48+5:302021-09-17T00:53:01+5:30
शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात फिरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे.

तडीपार गुंडाला ठोकल्या बेड्या
नाशिक : शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असतानाही विनापरवानगी शहरात फिरणाऱ्यास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. नदीम आयाज काझी (वय २८, रा. भारत नगर) असे पकडलेल्या तडीपार गुंडाचे नाव आहे. नदीम यास बुधवारी (दि. १५) सायंकाळी त्याच्या घराजवळून पकडले. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.