ऐवज लुटण्यारा‌ तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 10:22 PM2021-05-12T22:22:42+5:302021-05-13T00:34:14+5:30

इंदिरानगर : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्यास चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यारा‌ संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून 43 हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Tadipar criminal Karan Kaduskar arrested for looting | ऐवज लुटण्यारा‌ तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक

ऐवज लुटण्यारा‌ तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक

Next
ठळक मुद्दे त्यांच्याकडून 43 हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त

इंदिरानगर : इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने कैलासनगर परिसरात भरदिवसा घरफोडी आणि घरात शिरून बालकाच्या गळ्यास चाकू लावून आईच्या अंगावरील दागिने व रोख रक्कम एकूण 36 हजार रुपयांचा ऐवज लुटण्यारा‌ संशयित आरोपी तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक करण्यात येऊन त्यांच्याकडून 43 हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 18 मार्च रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पाम स्क्वेअर बिल्डिंग कैलास नगर या ठिकाणी दोन दुचाकी वरून आलेल्या चार अनोळखी इसमांनी या बिल्डिंग मधील दोन बंद घराचे दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत मध्ये प्रवेश करून त्यातील एका घरातून सोन्याचे व चांदीचे एकूण 15 हजारांचे दागिने लंपास केले होते तसेच त्यानंतर त्या अनोळखी इसमांनी बिल्डिंगच्या वाहन तळा मधील खोलीत राहत असलेल्या वॉचमनच्या घरात जबरदस्तीने प्रवेश करून वॉचमनच्या पत्‍नीला चाकूचा धाक दाखवून तिच्या मुलाला गळ्याला चाकू लावून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र रोख दहा हजार रुपये एक मोबाईल असा एकूण 35 हजार रुपयांचा ऐवज लुटून घराबाहेर उभ्या असलेल्या दोन दुचाकीवरून पळून गेले होते फिर्यादीस यादीवरील गुन्हेगाराचा छायाचित्राचा अल्बम दाखवला असता अंबड पोलीस ठाण्यातील यादीवरील तडीपार गुन्हेगार ऋषिकेश कांबळे एकोणवीस घरकुल योजना चुंचाळे शिवार अंबड यास ओळखले सदर आरोपी घोटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका दुकानाचे शटर तोडून पळून जात असताना घोटी पोलिसांनी पकडून त्याला अटक केली होती दरम्यान त्याच्याकडे चौकशी केली असता हद्दपार गुन्हेगार करण कडुसकर वीस अंबड याच्यासह इतर दोन साथीदारांची खोटी नावे सांगितली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश माईनकर मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार उपनिरीक्षक जाकीर शेख, शरद आहेर,प्रभाकर पवार , दत्तात्रय गवारे, एस माळी, यांनी सापळा रचून तडीपार गुन्हेगार करण कडुसकर यास अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या दोन मोटरसायकल, हत्यार घड्याळ, सोन्याचे दागिने रोख रक्कम, कपडे असा एकूण 43 हजार पन्नास रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे

 

Web Title: Tadipar criminal Karan Kaduskar arrested for looting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.