शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

सोळा लाख विद्यार्थ्यांची कलचाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:56 AM

दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कलचाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.

नाशिक : दहावीतील विद्यार्थ्यांची आवड व त्यांचा विविध शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रासोबतच कला कौशल्यांविषयीचा कल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या कलचाचणी परीक्षेला राज्यातील नऊ विभागांतून १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थी प्रविष्ट झाले.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळासह श्यामची आई फाउंडेशन व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन विभागामार्फत १८ डिसेंबर २०१८ ते १७ जानेवारी २०१९ या कालावधीत दहावीच्या विद्यार्थ्यांची कलचाचणी परीक्षा घेण्यात आली. संपूर्ण राज्यभरात घेतल्या जाणाऱ्या या कलचाचणीसाठी यावर्षी प्रथमच सर्वत्र मोबाइल अ‍ॅपचा वापर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिक्षकांसोबतच पालकांचेही या परीक्षेसाठी मार्गदर्शन मिळाल्याचे जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे समुपदेशक किरण बावा यांनी सांगितले.राज्यातील नऊ विभागांपैकी पुणे विभागातून २ लाख ६९ हजार २३४ विद्याथ्यांनी ही परीक्षा दिली, तर नागपूरमधून १ लाख ६१ हजार ७४६, औरंगाबादमधून १ लाख ८२ हजार २२८, मुंबईतून ३ लाख ४१ हजार ९०१, कोल्हापूरमधून १ लाख ३९ हजार ७९५, अमरावतीतून १ लाख ६६ हजार, २९६, नाशिकमधून १ लाख ९९ हजार ५३४, लातूरचे १ लाख ६ हजार ६२२ व कोकणातून ३४ हजार ५३० असे एकूण १६ लाख १ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी कल चाचणी परीक्षा दिली.

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळाMobileमोबाइल