Swords suspended over rookie employees | दांडीबाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार
दांडीबाज कर्मचाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार

ठळक मुद्देजिल्हा परिषद : ६९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसाअन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा परिषदेच्या सेवेत असतानाही न सांगता सलग दोन महिने कामावर गैरहजर असलेल्या कर्मचा-यांवर निलंबनाची कारवाई करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद प्रशासनाने तयारी सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून या सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदर कर्मचा-यांनी तत्काळ कामावर हजर होण्याचे व त्याचबरोबर गैरहजर राहण्यामागचे यथोचित कारणे दिल्यास त्यांच्यावरील कारवाई टळण्याची शक्यता आहे.


जिल्हा परिषदेतील सर्वच खात्यांमध्ये कर्मचा-यांच्या अपु-या संख्येमुळे अन्य कर्मचा-यांवर अतिरिक्तकामाचा ताण पडत असून, आजारपण, लग्नसमारंभ, अन्य महत्त्वाच्या कामांमुळे दररोज कर्मचारी रजेवर राहण्याचे प्रमाणही अधिक आहे. असे असतानाही काही कर्मचारी मात्र एक ते दोन महिन्यांपासून काही एक कारण न देता कामावरून गायब झाल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. अलीकडेच मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी सर्व खातेप्रमुखांना पत्र देऊन त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांची माहिती मागविली असता त्यात ६९ कर्मचारी दोन महिन्यांपासून बेपत्ता असल्याचे लक्षात आले. अशा कर्मचा-यांची यादी करून त्यांना खातेप्रमुखांनी कारणे दाखवा नोटीस बजाविण्याबरोबरच तत्काळ कामावर हजर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. या कर्मचा-यांनी दिलेला खुलासा योग्य वाटल्यास किरकोळ शास्ती करून त्यांना कामावर हजर करून घेतले जाईल, मात्र तसे न झाल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.

Web Title: Swords suspended over rookie employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.