स्वाइन फ्लू; आज कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:40 IST2017-09-15T00:39:14+5:302017-09-15T00:40:06+5:30

स्वाइन फ्लू; आज कार्यशाळा
नाशिक : शहरात स्वाइन फ्लूच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेची स्थिती निर्माण झाल्याने रुग्णांवर कशाप्रकारे निदान व उपचार व्हावे, याकरिता खासगी डॉक्टरांसाठी कार्यशाळा शुक्रवारी (दि.१५) दुपारी ४ वाजता आय.एम.ए. हॉलमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिली. कार्यशाळेत पुणे येथील डॉ. योगेश आसावा आणि डॉ. दिलीप गरुड हे मार्गदर्शन करणार असून, यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महापौर रंजना भानसी, विभागीय आयुक्त महेश झगडे, आयुक्त अभिषेक कृष्ण, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी सभापती शिवाजी गांगुर्डे उपस्थित राहणार आहेत.