खामखेड्यात स्वाइन फ्लूने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 00:08 IST2018-09-02T00:06:41+5:302018-09-02T00:08:50+5:30

खामखेडा : येथील प्रशांत साहेबराव बोरसे (२६) या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्वाइन फ्लूने नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. प्रशांत खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. तीन दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने सटाणा येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी अधिक उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

Swine flu deaths in Khamkhed | खामखेड्यात स्वाइन फ्लूने तरुणाचा मृत्यू

खामखेड्यात स्वाइन फ्लूने तरुणाचा मृत्यू

ठळक मुद्देसकाळी खामखेडा येथे अंत्यसंस्कार


 

खामखेडा : येथील प्रशांत साहेबराव बोरसे (२६) या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास स्वाइन फ्लूने नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले. प्रशांत खामखेडा येथील प्रगतिशील शेतकरी साहेबराव रामा बोरसे यांचा एकुलता मुलगा होता. तीन दिवसांपूर्वी तब्येत बरी नसल्याने सटाणा येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी अधिक उपचारासाठी त्याला नाशिक येथे हलविण्यात आले होते; मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. सकाळी खामखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आईवडील पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परिवार आहे.

Web Title: Swine flu deaths in Khamkhed