पोलीसपाटलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:00 IST2017-08-25T01:00:10+5:302017-08-25T01:00:28+5:30

तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी या रोगाने तिºहळ येथील पोलीसपाटलाचा बळी घेतला आहे. कळवण तालुक्यातील तिºहळ येथील पोलीसपाटील सोमनाथ चिमना बागुल यांना स्वाइन

Swine flu death by policeman | पोलीसपाटलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

पोलीसपाटलाचा स्वाइन फ्लूने मृत्यू

कळवण : तालुक्यात स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, गुरुवारी दुपारी या रोगाने तिºहळ येथील पोलीसपाटलाचा बळी घेतला आहे. कळवण तालुक्यातील तिºहळ येथील पोलीसपाटील सोमनाथ चिमना बागुल यांना स्वाइन
फ्लूची लागण झाली होती. नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. गेल्या सप्ताहात पोलिस पाटील सोमनाथ बागूल यांना स्वाइन फ्ल्यूचा प्रादुर्भाव झाल्याचे वैघकीय अहवालात स्पष्ट झाल्याने सोमनाथ बागूल यांना नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने रु ग्णालयात दुपारी बागूल यांनी अखेरचा श्वास घेतला. या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता घेऊन आरोग्य विभागाने आपली यंत्रणा कळवण तालुक्यात तैनात केली आहे.

Web Title: Swine flu death by policeman