वाहून गेलेला रस्ता चार दिवसात केला सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 21:05 IST2020-06-18T21:04:49+5:302020-06-18T21:05:33+5:30

पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र ९५३ चे चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना सप्तश्रृंगी गडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहातूक सुरळीत करण्यात आली.

The swept road started in four days | वाहून गेलेला रस्ता चार दिवसात केला सुरू

वाहून गेलेला रस्ता चार दिवसात केला सुरू

ठळक मुद्देचार ठिकाणी मोठ मोठ्या मोºया टाकून शेवटी रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्क
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील वणी-सापुतारा-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्र ९५३ चे चौपदरीकरणाचे काम सुरू असतांना सप्तश्रृंगी गडावर जोरदार पाऊस झाल्याने पर्यायी रस्ता वाहून गेल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने चौथ्या दिवशी महामार्गावरील वाहातूक सुरळीत करण्यात आली.
वणी, बोरगाव, सापुतारा, वघई, वासदा, सुरत या रस्त्याचे चौपदरी करणाचे काम सुरू असून भितबारी ते धनाई मातावणी पर्यत रस्त्याचे कुठे ऐकेरी तर कुठे दोन्ही बाजू वाहतूकीसाठी खुल्या करण्यात आल्या असून दोन ठिकाणी पुलाचे काम सुरु असतांना रविवारी (दि.१४) सायंकांळी सप्तश्रृंगी गडावर व अहिवंतवाडी गड परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पांडाणे येथील पुलाच्या बांधकामासाठी पर्यायी केलेला कच्चा मातीचा रस्ता वाहून गेल्यामुळे गुजरात व महाराष्ट्र अश्या दोन राज्याचा संपर्क तुटला. बातमी सर्वत्र पसरताच विधानसभा उपाध्यक्ष तथा दिंडोरी-पेठचे आमदार नरहरी झिरवाळ, तहसिलदार पंकज पवार, तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे, राष्ट्रीय महामार्गाचे उपअभियंता मनोज पाटील यांनी त्वरीत पुलाची पहाणी करु न त्वरीत रस्ता वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानंतर कामाला सुरवात करण्यात आली. परंतू ठेकेदारांकडील अपुऱ्या सामुग्रीमुळे बंद होते. त्यानंतर बुधवारी (दि.१७) पूर्ण दिवस काम करुन अखेर रस्त्याच्या चार ठिकाणी मोठ मोठ्या मोºया टाकून शेवटी रस्ता वाहतूकीसाठी मोकळा करुन देण्यात आला.

Web Title: The swept road started in four days