मिठाईचे दुकान आगीत भस्मसात

By Admin | Updated: May 6, 2017 01:14 IST2017-05-06T01:11:41+5:302017-05-06T01:14:07+5:30

येवला : जनता विद्यालयासमोर पटेल कॉलनीलगत असणाऱ्या ममता स्वीट्स मिठाई दुकानाला शुक्रवारी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने हे दुकान जळून खाक झाले.

Sweets shop fire | मिठाईचे दुकान आगीत भस्मसात

मिठाईचे दुकान आगीत भस्मसात

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : शहरातील जनता विद्यालयासमोर पटेल कॉलनीलगत असणाऱ्या ममता स्वीट्स मिठाई दुकानाला शुक्रवारी भल्या पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने हे दुकान जळून खाक झाले. आगीत मिठाई, फर्निचरसह सुमारे ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत चाललेले काम आटोपून नेहमीप्रमाणे दुकान बंद करून येथील दहा कारागीर दुकानाच्या वरच्या माळ्यावर झोपी गेले. शुक्र वारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास दुकानाच्या शटरमधून मोठ्या प्रमाणावर धूर आणि आगीचा लोट दिसू लागला. दुकानाचा रखवालदाराने दुकान मालकाला फोन करून ही माहिती दिली. हे दृश्य रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांनी
पाहिले. त्यांनी पोलिसांना याबाबत कळविले.
रात्रीच्या गस्तीवर असणारी पोलीस गाडी घटनास्थळी पोहचली. आग विझवण्यासाठी येवला पालिका आणि मनमाड पालिकेचे बंब यांना पाचारण करण्यात आले. विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागल्याचे लक्षात आले. विद्युत पुरवठा अगोदर खंडित करेपर्यंत संपूर्ण दुकान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.

Web Title: Sweets shop fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.