शेततळ्याच्या पाण्याने ऊसाला आणली गोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 15:45 IST2020-10-18T15:44:29+5:302020-10-18T15:45:00+5:30
लखमापूर : दिंडोरी तालुक्याला शेती मधील ग्रीन पट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता दिंडोरी बरोबरचं प्रगत शेती मध्ये चांदवड तालुक्यातील काही गावाचे पुढे येत आहे.उस शेतीला सुगीचे दिवस येण्याची चित्र पाहायला मिळत आहे.

शेततळ्याच्या पाण्याने ऊसाला आणली गोडी
लखमापूर : दिंडोरी तालुक्याला शेती मधील ग्रीन पट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता दिंडोरी बरोबरचं प्रगत शेती मध्ये चांदवड तालुक्यातील काही गावाचे पुढे येत आहे.उस शेतीला सुगीचे दिवस येण्याची चित्र पाहायला मिळत आहे.
दिंडोरी तालुक्यातील कादवा सहकारी साखर कारखाना हा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अव्वल स्थानी आहे. सध्या कादवाला उस लागवडीची आकडेवारी पाहाता, यंदा बळीराजांकादवाला भरभरु न उस उपलब्ध करून देईल अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. यंदा कृषी विभागाच्या माहितीच्या आधारे नुसत्या दिंडोरी तालुक्यात सुमारे २६५० हेक्टर च्या आसपास उसाची लागवड झाल्याची माहिती सुत्राकडून मिळते.
कादवाचा नवीन प्रयोग यशस्वी कादवाने सभासद वर्गासाठी विविध प्रकारचे ऊस बेणे देऊन सभासदांना ऊस लागवडीसाठी तयार केले.त्यामध्ये चांदवड तालुक्यातील शिंदे या गावचे व कादवा कारखान्याचे कर्तव्य दक्ष संचालक सुभाष शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये शेततळे तयार करून अत्यंत कमी पाण्यात तसेच अवघ्या पाच महिन्यात ८६०३२ ही ऊसाची जात आणून जवळ जवळ तीन हेक्टर ऊस लावून अजब प्रयोग करून अत्यंत कमी दिवसात एकरी शंभर टन ऊस उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. हा यशस्वी प्रयोग शिंदे यांनी आपल्या शेतामध्ये केला आहे. ही गोष्ट आदर्श घेण्यासारखी आहे.
सध्या द्राक्षे बागापेक्षा उस शेती आधिक फायदेशीर व कमी कालावधीत आधिक उत्पन्न देणारी ठरत असून तालुक्यातील शेतकरी वर्गाने उस पिकांला पसंती दिली आहे. कादवा आता लवकरच सुरू होणार असुन उसाला जास्तीत जास्त भाव मिळेल, व दोन हंगामातील झालेले नुकसान भरून निघण्यास मदत होईल. अशी अपेक्षा बळीराजांला वाटत आहे.
शेतकरी वर्गाने कुठलेही पिक घेण्यासाठी नियोजनावर ठाम राहावे. उस शेती सध्या शेतकरी वर्गाला उत्तम फल देणारी असून अत्यंत कमी मनुष्य बळात व कमी पाण्याच्या नियोजनावर उस शेती येत आहे. द्राक्षे बागापेक्षा उस शेतीला भांडवल, मनुष्यबळ, व अधिक उत्पन्न मिळण्याची शाश्वती राहाते.
- सुभाष शिंदे, कादवा संचालक, शिंदेगाव.