शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

स्विडनचा अभियंता सायकलवर स्वार; दहा महिन्यांत ओलांडल्या १७ देशांच्या सीमा

By azhar.sheikh | Published: May 09, 2018 3:38 PM

स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.

ठळक मुद्दे नाशिकमधील दिलासा केअर सेंटर या वृध्दाश्रमात मुक्काममंगळवारी (दि.८) त्याने मालेगावच्या दिशेने सायकल दामटविली पुढील चार वर्षे सायकलवरचकुठलाही विक्रमच्या उद्देशाने तो सायकलभ्रमंती करीत नाही

नाशिक : ‘हा छंद जीवाला लावी पिसे’ असे एका गीतकाराने म्हटले आहे, ते उगीच नाही. एखादा छंद जेव्हा माणसाला जडतो तेव्हा त्या छंदासाठी तो सर्व काही पणाला लावतो. स्वीडन देशाचा रहिवाशी असलेला व पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुण आपल्या सायकलींगच्या छंदापोटी चक्क जगभ्रमंतीला निघाला आहे. त्याने तीनशे दिवसांत १७ देशांच्या सीमा ओलांडल्या असून भारतात दाखला झाला आहे.स्वीडन येथील लिनस हा २९ वर्षांचा तरुण दहा महिन्यांपुर्वी सायकलने स्विडनमधून जगभ्रमंतीसाठी निघाला. त्याने आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात पाच दहा नव्हे तर १७ देशांच्या सीमा यशस्वीरित्या ओलांडल्या आहेत. भारत हा त्याचा १८वा क्रमांकाचा देश ठरला. संपुर्ण अभ्यास, आरोग्याच्या दृष्टीने आहार, आराम आणि सायकलिंगचे दिवसाचे किलोमीटर असा सर्व शास्त्रोक्त तंतोतंत नियोजनानुसार लिनस जगभ्रमंती सायकलवरुन करत आहे. यामागे त्याचा केवळ छंद असून कुठलाही विक्रम किंवा प्रसिध्दी मिळविण्याच्या उद्देशाने तो सायकलभ्रमंती करीत नाही. भारतात दाखल झाल्यानंतर त्याने इंटरनेटच्या माध्यमातून मिळविलेल्या नाशिकमधील लेखानगर भागातील दिलासा केअर सेंटर या वृध्दाश्रमात दोन दिवस स्वयंस्फूर्तीने मुक्काम केला. येथील आजी-आजोबांसोबत गप्पागोष्टी करत तो चांगलाच रमला. दोन दिवसांचा मुक्काम पुर्ण करुन मंगळवारी (दि.८) त्याने मालेगावच्या दिशेने सायकल दामटविली. खाण्यापिण्याचे सामान, कपडे, बुट असा सर्व लवाजमा असलेल्या बॅग रेंजरप्रकारच्या सायकलवर टांगून तो जगभ्रमंती करीत आहे. शरीरयष्टीने उंचपुरा धडधाकट असलेला लिनस सायकलवरुन जग फिरत आहे.

पुढील चार वर्षे सायकलवरचलिनस हा त्याच्या मायदेशी पुढील चार वर्षानंतर परतणार आहे. तोपर्यंत त्याचे आयुष्य हे सायकलच्या चाकांवरच फिरणार आहे. भारतासह १८ देशांची भ्रमंती पूर्ण के ल्यानंतर लिनस नेपाळच्या सीमेमध्ये प्रवेश करणार आहे. भारतामध्ये त्याला अधिवासासाठी ६० दिवसांचा व्हिसा मिळाला आहे. तोपर्यंत तो महत्त्वाच्या शहरांमधून मार्गस्थ होत प्रसिध्द ठिकाणांना भेटी देत नेपाळ सीमेत दाखल होणार आहे.भारत हा सुंदर देश असल्याचे मला जाणवले. भारताच्या सीमेत दाखल झाल्यानंतर एक वेगळ्याप्रकारचा मी अनुभव घेतला. बलाढ्य लोकशाही असलेला आणि वैविध्यपुर्ण भारतीय संस्कृती अनुभवण्यासाठी मला ६० दिवसही अपुरे पडणार.-लिनस, छंदवेडा सायकलपटू

टॅग्स :tourismपर्यटनNashikनाशिकIndiaभारत