अग्रवाल महिला मंडळातर्फे नाळेगाव शाळेत स्वेटर वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:42 IST2019-02-06T17:42:43+5:302019-02-06T17:42:53+5:30

मदतीचा हात : विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम

Sweater allocation to Nalegaon School by Agarwal Mahila Mandal | अग्रवाल महिला मंडळातर्फे नाळेगाव शाळेत स्वेटर वाटप

अग्रवाल महिला मंडळातर्फे नाळेगाव शाळेत स्वेटर वाटप

ठळक मुद्दे समाजसेवी शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नामुळे आणि धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती यमुनाताई अवकाळे यांच्या माध्यमातून अग्रवाल महिला मंडळाने नाळेगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला

दिंडोरी : तालुक्यातील नाळेगाव जि.प. शाळेतील मुलांना नाशिक येथील अग्रवाल महिला मंडळातर्फे स्वेटर व खाऊचे वाटप करण्यात आले.
मंडळाच्या प्रमुख शशी अग्रवाल, नीलम अग्रवाल , श्रीमती यमुनाताई अवकाळे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. रासेगाव केंद्रप्रमुख एस.बी. सावकार यांनी उपस्थितांचे स्वागत केले. व्यासपीठावर नाळेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच हिराबाई गांगोडे, ग्रामपंचायत सदस्य दिलीप वाघेरे , विजय कडाळी आदी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी समुह नृत्य, समुह गीते सादर केली. विशेष कलागुण नैपुण्य दाखवणाऱ्या ८ विदयार्थीनींना अग्रवाल महिला मंडळा तर्फे रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली. समाजसेवी शिक्षक बलराम माचरेकर यांच्या प्रयत्नामुळे आणि धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती यमुनाताई अवकाळे यांच्या माध्यमातून अग्रवाल महिला मंडळाने नाळेगाव शाळेतील विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला.
यापुढेही मदतीचे आश्वासन
मंडळाच्या प्रमुख शशी अग्रवाल यांनी यापुढेही गरजू विदयार्थ्यांना सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले. मुख्याध्यापक किशोर गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. शालेय समितीचे अध्यक्ष सोमनाथ थेटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सूत्रसंचालन सचिन वडजे यांनी केले. बलराम माचरेकर यांनी आभार मानले. यावेळी उपशिक्षक शांताराम नागरे, श्रीमती ठाकरे आदी उपस्थित होते.

Web Title: Sweater allocation to Nalegaon School by Agarwal Mahila Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक