शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
4
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
9
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
10
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
11
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
12
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
13
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
14
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
15
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
16
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
17
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
18
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
19
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
20
भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद, आता ५५ देशांमध्ये व्हिसा-मुक्त प्रवेशाची परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

शपथ घेताच शासकीय संकेतस्थळावर फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:04 IST

शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि लागलीच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे छायाचित्रही झळकले.

नाशिक : शनिवारी सकाळी घडलेल्या अत्यंत नाट्यमय घडामोडीनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि लागलीच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर मुख्यमंत्री म्हणून त्यांचे छायाचित्रही झळकले. निवडणूक निकालानंतर सत्तास्थापनेसंदर्भातील पेच निर्माण झाल्याने महाराष्टत राष्टपती राजवट लागू होती त्यामुळे संकेतस्थळावर केवळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचेच छायाचित्र होते.विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ता स्थापन करण्यासंदर्भात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या राजकीय घडामोडीनंतरही सत्तास्थापनेसंदर्भातील सस्पेन्स कायम होता. राज्यपालांनी दिलेल्या वेळेत भाजपाने सत्ता स्थापन करणार नसल्याचे जाहीर केल्यानंतर आणि अन्य पक्षांनीही दावा केला नसल्याने गेल्या १२ तारखेपासून महाराष्टÑात राष्टÑपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यामुळे साहजिकच महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर राज्यपाल कोश्यारी यांचेच छायचित्र होते.राष्टÑपती राजवट सुरू असतानाच दुसरीकडे सत्तास्थापनेतील वाटाघाटींनाही वेग आला होता. शिवसेना आणि राष्टÑवादीकडून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली असतानाच अजित पवारांनी काही आमदारांसह भाजपाशी हातमिळवणी केली आणि शनिवारी सकाळी फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी झाल्यानंतर शनिवारी दुपारनंतर संकेतस्थळावर त्यांचे छायाचित्रही झळकल्याचे सांगण्यात आले. रविवारी या संदर्भातील खात्री केली असता संकेतस्थळावर पुन्हा देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र दिसून आले.उपमुख्यमंत्र्यांचे मात्र छायाचित्र नाहीफडणवीस यांनी शनिवारी शपथ घेतल्यानंतर महाराष्टÑ शासनाच्या संकेतस्थळावर लागलीच त्यांचे छायाचित्र झळकले असले तरी उपमुख्यमंत्री म्हणून शपथग्रहण करणारे अजित पवार यांचे छायचित्र मात्र संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेले नव्हते. दोघांनी एकदाच शपथ घेऊनही उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नसल्याने अनेकांनी त्याचा राजकीय आणि कायदेशीर अडचणीचा भाग म्हणून पवार यांचा उल्लेख केला नसावा अशी चर्चा सुरू होती.

टॅग्स :onlineऑनलाइनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस