श्रमजिवी संघटनेतर्फे स्वावलंबन दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2021 00:37 IST2021-01-28T20:48:31+5:302021-01-29T00:37:44+5:30
त्र्यंबकेश्वर : स्वामी विवेकानंद जयंतीच्या पार्श्वभूमीवर श्रमजिवी संघटनेच्या वतीने श्रमजिवी सेवादलाने तहसील कार्यालय येथे स्वावलंबन दिन साजरा केला. संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांच्या संकल्पनेतून श्रमजिवी सेवा दलाची स्थापना करण्यात आली. यावेळी प्रशिक्षणार्थी मुलांनी तहसीलदार कार्यालय कॅम्पसमध्ये साफ सफाई करुन कचऱ्याची विल्हेवाट लावली.

गेट समोरील झाडांचा परिसर स्वच्छ केला. या कामाची पाहणी तहसीलदार दीपक गिरासे, निवासी नायब तहसीलदार रामकिसन राठोड, मंडल अधिकारी हेमंत कुलकर्णी आदींनी केली. यावेळी सेवादल प्रशिक्षक राम डोखे, प्रशिक्षिका मनीषा पुंजारे, हिरामण घाटाळ, भाऊसाहेब भोईर व संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते .