जऊळके उपसरपंचपदी स्वाती आव्हाटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 17:35 IST2020-12-16T17:34:52+5:302020-12-16T17:35:20+5:30
जळगाव नेऊर.. येवला तालुक्यातील जऊळके ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी स्वाती साहेबराव आव्हाटे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.

जऊळके उपसरपंचपदी स्वाती आव्हाटे
आवर्तन पद्धतीने अनिता जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेविका एम.ऐ. शेख यांनी आज विशेष सभेचे आयोजन केले होते. सरपंच ज्योती खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत स्वाती आव्हाटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य कल्पना दराडे, बेबीताई भळसाने,अनिता जाधव, अमोल सोनवणे, साहेबराव आव्हाटे, उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक विठोबा जाधव, शांताराम सोनवणे,दगु जाधव, पांडुरंग जाधव,अर्जुन सोनवणे, प्रकाश सोनवणे,प्रभाकर खैरणार, भाऊराव जाधव, उत्तम सोनवणे , मधुकर बळसाने, भाऊराव जाधव, सुकलाल खाडे ,सुकदेव मोरे,शामराव आव्हाटे,यमाजी आव्हाटे,लहानु खैरनार ,सोमनाथ जाधव,बळवंत भळसाणे,संतोष पवार,दिपक भडकवाड, उपस्थित होते.