सुरमयी स्वरातून बहरली ‘स्वरवंदना’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:40 IST2017-09-17T00:39:35+5:302017-09-17T00:40:08+5:30
राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते.

सुरमयी स्वरातून बहरली ‘स्वरवंदना’
नाशिक : राग मधुकंस आणि खमाज रागातील धून पेश करत सतारवादक कमलाकर जोशी यांनी नाशिककर रसिकांची मने जिंकली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरूकूलतर्फे आयोजित ‘स्वरवंदना’ या सतार वादन कार्यक्रमाचे कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा सभागृहात आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरूकूलच्या शिष्यांनी देखील सतार वादन करत आपली कला पेश केली. यात सुजाता मंजुनाथ आणि सुमंत मंजुनाथ यांनी राग हंस ध्वनी, शर्मिला जोशी यांनी राग पुरीया कल्याण, तसेच स्मिता कापडणीस यांनी नंद रागातील आणि वासंती खाडीलकर यांनी मधुवंती रागातून सतारीचे सुरमयी सुर छेडले. यासर्व शिष्यांना तबल्यावर गौरव तांबे यांनी साथसंगत दिली. यानंतर मिताली भट आणि स्वाती शाह यांनी राग किरवाणी, गीता भट आणि ज्योती डोखळे यांनी राग मिया मल्हारचे सादरीकरण केले यांना वैण्णवी भडकमकर यांची तबल्यावर साथसंगत केली. सतारवादनाची मैफल उत्तरोत्तर रंगत असताना निलीमा कुलकर्णी यांनी राग जोग तर सुनिता देशपांडे यांनी राग झिंझोटी सादर करत या मैफलीत विशेष रंगत आणली. यानंतर अकादमीच्या ज्येष्ठ शिष्या उमा निशाणदार, अंजली नांदुरकर, मोहिनी कुलकर्णी, सुप्रिया फणसळकर, सोनल शहाणे, राधिका गोडबोले, सुनीता जळगावकर यांनी सामुहिक सतार वादन करताना राग बागेश्रीचे सादरीक रण केले, त्यांना सुजीत काळे यांनी तबल्यावर साथसंगत केली. या सतारवादन मैफलीस विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.