शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

एकावेळी एकच कार्ड होणार स्वॅप

By admin | Updated: November 16, 2016 22:43 IST

ग्राहकांची कोंडी : बॅँकांकडून अनेकविध उपाययोजना

 नाशिक : जर तुमच्या खिशात अनेक बॅँकांचे एटीएम कार्ड असतील आणि तुम्ही प्रत्येक कार्डाचा वापर करून एटीएममधून रक्कम काढण्याचा विचार करीत असाल तर, जरा थांबा. कारण तुमच्याकडे कितीही कार्ड असले तरी तुम्हाला वापर मात्र कोणत्याही एकाच कार्डाचा करता येणार आहे. मोदींच्या घोषणेनंतर बॅँका आणि एटीएम बाहेर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. पैसे काढण्याची मर्यादा मर्यादित असल्यामुळे पैसे मिळविण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. या परिस्थितीत रांगेतील जास्तीत जास्त ग्राहकाला पैसे अदा व्हावेत यासाठी पैसे काढण्यावर मर्यादा आणली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्राहकांकडे कितीही एटीएम कार्ड असले तरी त्यांना एकावेळी एकच कार्ड वापरता येणार आहे. दुसरे कार्ड वापरल्यास ते कार्यरत होणार नसल्याची व्यवस्था मशीनमध्ये करण्यात आलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजार आणि पाचशेची नोट चलनातून रद्द केल्यानंतर ग्राहकांनी त्याच रात्री एटीएममध्ये जाऊन तीन वेळा ४०० याप्रमाणे १२०० रुपये काढून ५०० आणि १००० ची नोट एटीएम मशीनमधून येणार नाही याची काळजी घेतली. अनेकांनी त्यांच्याजवळील कार्डाचा वापर करीत जास्तीत जास्त रक्कम काढली. यामुळे एटीएममध्ये बराच वेळ लागण्याबरोबरच इतरांनाही ताटकळत उभे रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेनुसार आता एकावेळी एकच कार्ड एटीएममधून स्वॅप करता येणार आहे. त्यामुळे इतर ग्राहकांना पैसे काढता येण्यासाठी वेळ मिळणार आहे. (प्रतिनिधी)