स्वामीनगरला कारची काच फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 01:17 IST2020-08-04T23:06:34+5:302020-08-05T01:17:20+5:30
सिडको : अंबड परिसरातील स्वामीनगर भागात दोन गटांत मोबाइलवरून झालेल्या वादात रस्त्यालगत असलेल्या एका स्विफ्ट डिझायर कारच्या समाजकंटकांनी काच फोडून नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघा संशयितांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तुळशीराम नाईक (रा.स्वामीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महालक्षमीनगर जवळ सोमवारी रात्री ते भावासोबत उभे होते. यावेळी संशयित आरोपी विशाल भगत (२०, रा.दत्तनगर), अभिषेक विश्वकर्मा (२०, रा.स्वामीनगर) व त्यांचे इतर दोन साथीदार यांनी आमच्याशी मोबाइलच्या कारणावरून वाद घातला यानंतर या चारही आरोपींनी त्यांच्या घराजवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या कोणाच्या कारवर दगडफेक करत दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या फिर्यादीवरून पोलिसांनी भगत व विश्वकर्मा यांना अटक केली असून, त्यांच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे.