महामण्डलेश्‍वर स्वामी सोमेश्वरानंद झाले पदवीधर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2020 09:46 PM2020-11-21T21:46:56+5:302020-11-22T01:50:07+5:30

त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत तथा श्रीनिरंजनी पंचायती अखाड्याचे महामंडलेश्वर १००८ श्रीश्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे नुकतीच बी.ए. पदवीधर झाले आहेत.

Swami Someshwarananda became a graduate on Mahamandaleshwar! | महामण्डलेश्‍वर स्वामी सोमेश्वरानंद झाले पदवीधर !

स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे बीए (कला ) शाखेतून पास झाल्याबद्दल डॉ. ई. वायुनदंन यांच्या हस्ते व प्रा. प्रकाश देशमुख यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

googlenewsNext
ठळक मुद्देमुक्त विद्यापीठामुळे झाले शक्य : स्वामी सोमेश्‍वरानंद

त्र्यंबकेश्वर : एखाद्या व्यक्तीची शिक्षणाची जिद्द काही अपरिहार्य कारणामुळे राहुन गेली असेल, पण संधी मिळाल्या नंतर मेहनत कष्ट करण्याची जिद्द असेल तर असा माणूस अशक्य ते शक्य करून दाखवितो. बेझे नाशिक येथील श्रीराम शक्तिपीठाचे पिठाधिश्वर हनुमान भक्त महंत तथा श्रीनिरंजनी पंचायती अखाड्याचे महामंडलेश्वर १००८ श्रीश्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती महाराज हे नुकतीच बी.ए. पदवीधर झाले आहेत.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे हे शक्य झाले असल्याचे श्रीस्वामी सोमेश्वरानंद सरस्वती यांनी संस्थेविषयी आदराने उल्लेख करुन ऋणनिर्देश व्यक्त केला. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठांमुळे अनेकांना शिक्षणाची कवाडे खुली करून दिली आहेत. यामुळेच आपण पदवी प्राप्त करू शकलो, असे स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी मत व्यक्त केले.

४५ वर्षीय स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती महाराज यांनी येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून कला शाखेतील इतिहास या विषयाची पदवी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केली आहे. याबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ई. वायुनंदन व संचालक प्रा. डॉ. प्रकाश देशमुख यांनी त्यांची भेट घेत सत्कार केला.
यावेळी बोलताना स्वामी सोमेश्‍वरानंद सरस्वती म्हणाले, काही कारणांनी शिक्षण काही वर्षांपासून अर्धवट राहिले होते. भक्तिमार्गात आमचे ग्रंथ पारायण, ग्रंथ अभ्यास तर होत होताच, परंतु शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत होती. ते शिक्षण पूर्ण करण्याची संधी मुक्त विद्यापीठाने दिली. बेझे येथील आश्रम परिसरात मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करून या भागातील शिक्षण अपूर्ण राहिलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करून देण्याचा मानस असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 

Web Title: Swami Someshwarananda became a graduate on Mahamandaleshwar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.