सुवर्णा मटाले यांनी स्वीकारला पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:11 IST2021-07-24T04:11:12+5:302021-07-24T04:11:12+5:30
नुकत्याच झालेल्या प्रभागसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा मटाले यांची सिडको प्रभाग सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. ...

सुवर्णा मटाले यांनी स्वीकारला पदभार
नुकत्याच झालेल्या प्रभागसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुवर्णा मटाले यांची सिडको प्रभाग सभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी मटाले यांनी महापालिकेत प्रवेश केला. सभापती दालनातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करीत त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मटाले यांना शुभेच्छा देताना, सिडकोच्या विकासाला अधिक वेग येईल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेवक शामकुमार साबळे, सुदाम डेमसे, भूषण राणे, राकेश दोंदे, पवन मटाले आदी उपस्थित होते.
(फोटो २३ सिडको) प्रभाग सभापती सुवर्णा मटाले पदभार स्वीकारताना शुभेच्छा देताना, सुधाकर बडगुजर, श्यामकुमार साबळे, सुदाम डेमसे, भूषण राणे, राकेश दोंदे आदी.