शाश्वत विकास हीच खरी स्मार्ट सिटीची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:07 IST2020-02-29T00:07:13+5:302020-02-29T00:07:33+5:30
शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.

स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्हच्या उद््घाटनाप्रसंगी उद््घाटक महापौर सतीश कुलकर्णी. समवेत प्रकाश थविल, होशी घासवला, आस्तिककुमार पाण्डेय, राधाकृष्ण गमे, विश्वास नांगरे-पाटील, सुरज मांढरे, लीना बनसोड, सतीश सोनवणे, विक्रम सहगल आदी.
नाशिक : शहरांचा विकास करताना तो पर्यावरण स्नेही आणि समतोल असायला हवा, त्याचबरोबर त्याच्या मूलभूत सुविधांचा विचार करून नियोजन हवे, त्याचबरोबर शाश्वत विकास साधायला हवा, असा सूर शुक्रवारी (दि.२८) आठव्या राष्टÑीय स्मार्ट सिटी कॉन्क्लेव्ह-२०२० मध्ये मान्यवरांच्या चर्चासत्रात निघाला.
नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमी आणि नाशिक महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि.२८) च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्यासह यांनी मान्यवरांनी केले. कार्यक्रमास बिझनेस वर्ल्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी होशी घासवाला, सीएसआरएफचे महासंचालक विक्रम सहगल, औरंगाबाद मनपाचे आयुक्तअस्तिककुमार पाण्डेय, स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरात अनेक प्रकल्प साकारले जात असले तरी वाहतुकीबाबत मात्र ठोस प्रकल्प राबविले जात नसल्याची खंत महापौर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. लीना बनसोड यांनीही मार्गदर्शन केले.
निसर्ग आणि पर्यावरणाचा समतोल साधून विकास करताना मानसिक स्वास्थ्याचा विचार केला पाहिजे केवळ पायाभूत सुविधा देऊन शहरे स्मार्ट होत नाहीत, असे मत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी व्यक्त केले. बदलत्या काळात स्मार्ट पोलिसिंगची गरज असून, त्यादृष्टीने शहरात विविध भागांत सीसीटीव्ही बसविले जात आहेत. तसेच नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून स्मार्ट पोलिसिंग शक्य असल्याचे नांगरे पाटील यांनी सांगितले.
शहरांबरोबर गावे स्मार्ट झाली पाहिजेत तसे झाल्यास शहरात नागरिकांचे होणारे स्थलांतर कमी हाईल, असे सांगितले. शहरात जबाबदार नागरिक घडले तर खऱ्या अर्थाने विकास होईल, असे बनसोड यांनी सांगितले. प्रकाश थविल यांनी शहतील प्रकल्पांची माहिती दिली.
दिवसभरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. पीपीपी तत्त्वावरील स्मार्ट लाइट प्रकल्पाबाबत बिझनेस वर्ल्डच्या वतीने नाश्किच्या स्मार्ट सिटीचे प्रकाश थविल यांना गौरविण्यात आले.