बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 00:42 IST2019-07-21T00:41:45+5:302019-07-21T00:42:35+5:30
वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक युवक बुडाल्याची घटना शुक्र वारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. आनंद गायकवाड असे या युवकाचे नाव असून, तो नाशिक येथील असल्याचे समजते.

बॅक वॉटरमध्ये तरुण बुडाल्याचा संशय
घोटी : वैतरणा धरणाच्या बॅक वॉटरमध्ये एक युवक बुडाल्याची घटना शुक्र वारी संध्याकाळच्या सुमारास घडल्याचा संशय आहे. आनंद गायकवाड असे या युवकाचे नाव असून, तो नाशिक येथील असल्याचे समजते.
मिळालेली माहिती अशी की, वैतरणा धरण परिसरात फिरण्यासाठी शुक्र वारी नाशिकचे ३० ते ३५ युवक आले होते. पार्टीसाठी गेले असता ही घटना घडल्याचा संशय बेपत्ता युवकाच्या मित्रांनी व्यक्त केला. नक्की बुडाला की कुठे गेला हे सांगता येत नाही असे त्याच्या मित्रांनी सांगितले. बेपत्ता युवकाचा मच्छीमारांकडून शोध सुरू आहे. युवक धरणातच बुडाला असल्याचा मित्रांचा संशय आहे. दरम्यान, पुन्हा एकदा वैतरणा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धरण परिसरात पावसाळ्यामध्ये या घटना नेहमीच घडत असतात. मात्र आजपावेतो प्रशासनाने कुठलेही सूचना फलक लावलेले नाहीत वा सुरक्षारक्षकही नेमलेला नाही.