मालेगावी जकात नाका हस्तांतरण प्रकरणी करवसुली अधीक्षक निलंबित
By Admin | Updated: August 30, 2015 22:46 IST2015-08-30T22:45:23+5:302015-08-30T22:46:14+5:30
मालेगावी जकात नाका हस्तांतरण प्रकरणी करवसुली अधीक्षक निलंबित

मालेगावी जकात नाका हस्तांतरण प्रकरणी करवसुली अधीक्षक निलंबित
मालेगाव : शहरातील वादग्रस्त जकात नाक्याप्रकरणी महानगरपालिका आयुक्तांनी प्रभारी करवसुली अधीक्षकांना निलंबित केले आहे. परंतु यातील दुसऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर उपआयुक्तांनी कारवाई न केल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
येथील महानगरपालिका हद्दीत जकात बंद होऊन स्थानिक सेवा कर लावण्यात आल्याने मनपाच्या मालकीचे जकात नाके बंद पडले आहे. यातील नवीन बसस्थानक, किडवाई रस्ता व रजारोड येथील जकात नाके खासगी मालकांना बेकायदा देण्याबरोबरच पदाचा दुरुपयोग केल्याचा साबळेंवर आरोप ठेवण्यात आला आहे.
हे जकात नाके व्यवसायासाठी दिल्याने या प्रकरणी मोठी खळबळ उडाली होती. यात उपआयुक्त व संकीर्णकर अधीक्षकांनी अर्थपूर्ण संगनमत केल्याचा आरोप करण्यात आल्याने या दोघांवर संशयाची सुई असल्याने आयुक्त डॉ. लतीश देशमुख यांनी उपआयुक्तांसह संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. संबंधित मालकांना नाके खाली करण्याचे आदेश दिले होते.
याविरोधात खासगी मालकांनी स्थगिती मिळवली. यात प्रभारी करवसुली अधीक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र संबंधित उपायुक्तांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होते, याकडे शहरवासींयांचे लक्ष लागून राहिले आहे. यात प्रभारी करवसुली अधीक्षकांकडे येथील इंधनाचा पदभार असून, यात मोठा अपहार करण्यात येत असल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी)