गाय चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:44 IST2018-10-13T00:01:04+5:302018-10-13T00:44:12+5:30
पंचवटीतील दत्तनगरमधून जर्सी गाय टेम्पोत भरून चोरण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़

गाय चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास अटक
नाशिक : पंचवटीतील दत्तनगरमधून जर्सी गाय टेम्पोत भरून चोरण्याचा प्रयत्न करणाºया संशयितास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे़ राजेश रत्नाकर निकम (४२, रा़ राहुलवाडी, पेठरोड, पंचवटी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे़ दरम्यान, निकमचे दोन साथीदार फरार झाले आहेत़
दत्तनगरमधील सुनील ढाकणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुरुवारी (दि़११) पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ बांधलेली २५ हजार रुपये किमतीची जर्सी गाय संशयित राजेश निकम व त्याचे दोन साथीदार हे टेम्पोत टाकून चोरून नेण्याचा प्रयत्न करीत होते़ याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़