शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
रुपाली ठोंबरे पाटील, अमोल मिटकरींना अजित पवारांचा धक्का; राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
3
भोपाळमध्ये मॉडेल खुशबूचा संशयास्पद मृत्यू; आईनं लावला 'लव्ह जिहाद'चा आरोप, प्रियकराला अटक
4
आता घरबसल्या आधारकार्डमध्ये करा बदल; UIDAI कडून नवीन आधार अ‍ॅप लाँच, वैशिष्ट्ये पाहून शॉक व्हाल
5
लॅपटॉप चार्जर केबलवरचा 'तो' काळा गोळा कशासाठी असतो? अनेकांनी पाहिला असेल पण...
6
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
7
'सैयारा' फेम अनीत पड्डा कॉलेजच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणार, मग करणार 'शक्ती शालिनी'ला सुरुवात
8
तिरुपती लाडू घोटाळा: ५ वर्षात पुरवले ६८ लाख किलो बनावट तूप, टँकरचे लेबल बदलून केली फसवणूक
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या काही तासांत सुटली, लग्नाच्या पहिल्याच रात्री नवऱ्याचा मृत्यू
10
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
11
Manifestation: लाल पेन, पांढरा कागद, ११ नोव्हेंबरला इच्छापूर्तीसाठी Manifest करा ११:११ चे पोर्टल!
12
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
13
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
14
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
15
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
16
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
17
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
18
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
19
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
20
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”

कारमधील संशयितांनी आयफोन हिसकावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:46 IST

‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़

नाशिक : ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ अशी धमकी देत इंडिका कारमधून आलेल्या दोघा संशयितांनी तरुणाचा आयफोन हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी (दि़२०) दुपारी कॉलेजरोवर घडली़  पाथर्डी फाट्यावरील गजानननगरमध्ये अठरा वर्षीय यश संधान हा तरुण राहतो़ शुक्रवारी दुपारच्या सुमारास यश हा कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्याने पायी जात होता़ त्यावेळी एका पांढºया रंगाच्या इंडिका कारमधून दोन संशयित आले़ त्यांनी यशच्या जवळ जात ‘फोनवर कोणाशी बोलतोय, चल दाखवं’ असे म्हणत आयफोन मोबाइल बळजबरीने घेण्याचा प्रयत्न केला़ त्यांना यशने नकार देताच या दोघांनी बळजबरीने मोबाइल हिसकावला व फरार झाले़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़द्वारका परिसरातून बुलेटची चोरीद्वारकाजवळील माणेकशा नगरमधील रहिवासी प्रणव चांडोले (रा़ विष्णूसागर अपार्टमेंट) यांची ९० हजार रुपये किमतीची रॉयल एनफिल्ड क्लासिक बुलेट (एमएच १५, जीएच ७००५) चोरट्यांनी १६ व १७ जुलै या कालावधीत चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून चोरून नेली़ भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मटका अड्ड्यावर छापादेवळाली गावातील वसुंधरा फर्टिलायझर दुकानाच्या मागे आकड्यांवर मटका जुगार अड्ड्यावर नाशिकरोड पोलिसांनी शुक्रवारी (दि़२०) रात्री छापा टाकला़ या प्रकरणी संशयित बाळू भिंगारे याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे़मांस बाळगल्याप्रकरणी गुन्हाचिकन शॉपच्या शेजारी विक्री करण्याच्या उद्देशाने जनावरांचे ३० किलो मांस बाळगणाºया शमशुद्दीन शहा (रा़ चिंचोळे गाव, अंबड) याच्या विरोधात अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़रिक्षा लावण्याच्या कारणावरून मारहाणमित्राला भेटण्यासाठी वज्रेश्वरी झोपडपट्टीत गेलेल्या सचिन सूर्यवंशी (रा़ पेठरोड) यास संशयित एजाज शेख व यासीन शेख या दोघांनी रिक्षा लावण्याच्या कारणावरून कुरापत काढून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (दि़१९) रात्रीच्या सुमारास घडली़ याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी एजाज व यासीन या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे़

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय