पगारे हत्त्येतील संशयित योगेश शेवरे न्यायालयास शरण

By Admin | Updated: May 29, 2014 00:22 IST2014-05-29T00:21:22+5:302014-05-29T00:22:22+5:30

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे हत्त्या प्रकरणातील संशयित योगेश शेवरे हा बुधवारी न्यायालयाला शरण आला़ न्यायालयाने शेवरेला १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़

Suspected Yogesh Chevre of Pagare Hatayay surrendered before the court | पगारे हत्त्येतील संशयित योगेश शेवरे न्यायालयास शरण

पगारे हत्त्येतील संशयित योगेश शेवरे न्यायालयास शरण

नाशिक : मल्हारखाण झोपडप˜ीतील सराईत गुन्हेगार भीम पगारे हत्त्या प्रकरणातील संशयित योगेश शेवरे हा बुधवारी न्यायालयाला शरण आला़ न्यायालयाने शेवरेला १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत़
सराईत गुन्हेगार पगारेची ९ मे रोजी रात्री गोळ्या झाडून तसेच तीक्ष्ण हत्त्याराने वार करून हत्त्या झाली़ या हत्त्येप्रकरणी मोनिका काळे यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे, मंगेश किरण शेवरे, रामदास चांगले, शरद मारुती चांगले, गणेश बाळासाहेब चांगले यांच्यावर इंदिरानगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
या हत्त्येनंतर पोलिसांनी नीलेश ऊर्फ भावड्या किरण शेवरे व मंगेश किरण शेवरे या दोघांना अटक केली होती़ हे दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत़ पंचवटीतील हांडे व पगारे खून प्रकरणातील संशयित किशोर बरू हा गुरुवारी (दि़२२) रोजी पंचवटी पोलिसांना शरण आला़ त्यानंतर सातच दिवसांनी चौथा संशयित योगेश शेवरे हा न्यायालयास शरण आला़ त्यास न्यायालयीन कोठडी देण्यात आली असून, न्यायालयीन आदेशानंतर म्हणजेच गुरुवारी त्यास इंदिरानगर पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Suspected Yogesh Chevre of Pagare Hatayay surrendered before the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.