सुरक्षारक्षक मारहाण प्रकरणी संशयितास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 01:07 IST2018-10-06T01:06:05+5:302018-10-06T01:07:47+5:30
हिरावाडी परिसरातील बनारसीनगरमध्ये असलेल्या एका इमारतीतील सुरक्षारक्षकास ‘तुझी मुलगी कुठे आहे’ असे विचारून त्याचा अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणारा संशयित योगेश चव्हाण यास पंचवटी पोलिसांनी पंधरा दिवसांनी अटक केली आहे.

सुरक्षारक्षक मारहाण प्रकरणी संशयितास अटक
पंचवटी : हिरावाडी परिसरातील बनारसीनगरमध्ये असलेल्या एका इमारतीतील सुरक्षारक्षकास ‘तुझी मुलगी कुठे आहे’ असे विचारून त्याचा अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रयत्न करणारा संशयित योगेश चव्हाण यास पंचवटी पोलिसांनी पंधरा दिवसांनी अटक केली आहे. सुरक्षारक्षकास बेदम मारहाण केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी संशयित चव्हाणसह त्याच्या अन्य दोघा साथीदारांवर मारहाणीचा गुन्हा दाखल केला होता.
१९ सप्टेंबरच्या रात्री हिरावाडीतील बनारसीनगरमधील एका सदनिकेमागे राहणाऱ्या सुरक्षारक्षकाच्या अल्पवयीन मुलीस सराईत चव्हाण याने झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती़ मात्र, सुरक्षारक्षकास जाग आल्याने त्याने संशयितांना हटकले असता त्यांनी तोंडावर काहीतरी मारून जखमी केले होते़ तर मुलीने घटनास्थळावरून पळ काढून शेजारच्या इमारतीत धाव घेतल्याची तेथील नागरिकांनी माहिती दिली होती़ तसेच या मुलीने संशयितांपैकी एकास ओळखले होते़ या प्रकरणी सुरक्षारक्षकाने पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़