संशयित गुन्हेगारांची वरात

By Admin | Updated: January 29, 2017 22:24 IST2017-01-29T22:24:25+5:302017-01-29T22:24:51+5:30

संशयित गुन्हेगारांची वरात

Suspected criminals | संशयित गुन्हेगारांची वरात

संशयित गुन्हेगारांची वरात

नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड येथे गेल्या सोमवारी झालेल्या मारामारीच्या गुन्ह्यातील संशयितांची उपनगर पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी भर लोकवस्तीतून वरात काढली. यामुळे टवाळखोरी करणाऱ्यांना चांगलाच वचक बसला आहे.  महाविद्यालयात झालेल्या मारमारीच्या कारणावरून गेल्या सोमवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास आर्टिलरी सेंटररोड येथे काही युवकांनी सागर उज्जैनवाला या युवकाचा पाठलाग करून बेदम मारहाण करत बर्फ फोडण्याच्या टोच्याने वार करून जखमी केले होते. आर्टिलरी सेंटररोड जैन मंदिरासमोरील मनपाचे गाळे, क्रीडांगण, समाजमंदिर या भागात टवाळखोरांचा उपद्रव वाढला असून, युवती, महिलांची छेडछाड करण्याचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सहायक पोलीस आयुक्त मोहन ठाकूर, उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत, देवराज बोरसे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश येवला व पोलीस कर्मचाऱ्यांनी मारामारीच्या गुन्ह्यातील चार संशयितांची शुक्रवारी सायंकाळी आर्टिलरी सेंटररोड खोले मळा येथून वरात काढली होती. संशयितांना पोलीस अधिकाऱ्यांनी पायीच आर्टिलरी सेंटररोड, देवळालीगाव, गाडेकर मळा, मनपा शाळा क्रमांक १२५ चे क्रीडांगण आदि भागातून फिरविले. (प्रतिनिधी)


 

Web Title: Suspected criminals