उगलमुगले खुनातील संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:06 IST2017-10-09T00:06:03+5:302017-10-09T00:06:09+5:30

उगलमुगले खुनातील संशयितास अटक पंचवटी : वाल्मीकनगर परिसरातील युवकाचे अपहरण व खून प्रकरणातील फरार संशयित गोपाळ गोसावी यास पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि़८) कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून ताब्यात घेतले़ गत अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या गोसावीच्या मागावर पोलीस होते़

The suspect arrested in the fugitive murder case | उगलमुगले खुनातील संशयितास अटक

उगलमुगले खुनातील संशयितास अटक

पंचवटी : वाल्मीकनगर परिसरातील युवकाचे अपहरण व खून प्रकरणातील फरार संशयित गोपाळ गोसावी यास पंचवटी पोलिसांनी रविवारी (दि़८) कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून ताब्यात घेतले़ गत अनेक महिन्यांपासून फरार असलेल्या गोसावीच्या मागावर पोलीस होते़
वाल्मीकनगर येथे राहणाºया जालिंधर ऊर्फ ज्वाल्या अंबादास उगलमुगले याचे संशयितांनी दोन वर्षांपूर्वी अपहरण करून खून केला़ तर उगलमुगलेच्या नातेवाइकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार केली होती. तब्बल पावणेदोन वर्षे उलटूनही या प्रकरणाचा तपास लागलेला नव्हता. पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या माहितीवरून संशयित अविनाश कौलकर, रोहित कडाळे, श्याम महाजन, कुंदन परदेशी, राकेश कोष्टी आदी पाच संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी यांच्या सांगण्यावरून उगलमुगले याचा खून केल्याची कबुली दिल्याने पोलिसांनी शेट्टी यांनाही अटक केली़
दरम्यान, उगलमुगले खून प्रकरणातील संशयित गोसावी हा रविवारी (दि़८) कसारा येथे असल्याची माहिती मिळाली असता सहायक पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, उत्तम खरपडे, जितेंद्र पवार, बाळासाहेब वाघ, मधुकर पिंपळके यांंनी कसारा रेल्वेस्थानकाबाहेरून गोसावीला ताब्यात घेतले.

Web Title: The suspect arrested in the fugitive murder case