शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

ठाण्यातील गोळीबारप्रकरणी संशयितास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 1:43 AM

ठाण्यामधील कळवा पूर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारून जबरी लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

ठळक मुद्देनिलगिरी बागेत सापळा : अट्टल गुन्हेगाराने केली होती हत्या

नाशिक : ठाण्यामधील कळवा पूर्व भागातील एका मेडिकलमध्ये घुसून गोळीबार करत झोपलेल्या युवकाला ठार मारून जबरी लूट करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिक मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून पिस्तूलसह काडतुसे, दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सरफराज हरून अन्सारी (२६, रा. रांची, राज्य झारखंड) असे या संशयित गुन्हेगाराचे नाव आहे. त्याने नाशिकसह मालेगाव, चांदवड, चाळीसगाव रोड या ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटेच्या सुमारास वीर युवराज मेडिकल स्टोअर्सचे शटर उचकटवून चोरट्याने घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र मेडिकलमध्ये प्रेमसिंग किशोरसिंग राजपुरोहित (४६) हे झोपलेले होते. शटरच्या आवाजाने प्रेमसिंग झोपेतून जागे झाले. त्यावेळी अन्सारीने प्रेमसिंगवर गोळी झाडून त्यांचा खून केला व गल्ल्यातील ८ हजार ६५० रु पये घेऊन पोबारा केला होता. गोळीबाराची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. घटनेनंतर ठाणे पोलिसांनी सीसीटीव्हीची पाहणी करून संशयिताच्या शोधासाठी तपासाला गती दिली.दरम्यान, गुन्हेगारांच्या आदानप्रदान कार्यक्र मात ठाणे पोलिसांनी संशयिताचा फोटो नाशिक पोलिसांकडे पाठविला. त्यानुसार मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने शहरात शोधमोहीम राबविली. आपल्या गोपनीय नेटवर्कद्वारे त्याची चाचपणी सुरू केली. दरम्यान, आडगाव शिवाराजवळील निलगिरी बाग झोपडपट्टीत संशयित सरफराजसोबत काही महिला फिरत असल्याचे पोलिसांना लक्षात आले. सरफराज हा चोरी करत असून, तो अधूनमधून नाशिकला आमच्याकडे येत असल्याची कबुली या महिलांनी दिली.पथकाने गुरु वारी (दि.१५) सरफराजला ताब्यात घेण्यासाठी सकाळी सात वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर व पोलीस हवालदार केदार यांच्या पथकाने निलगिरी बाग परिसरात सापळा रचून अटक केली. दोघा कर्मचाऱ्यांना आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी २५ हजार रुपयांचे बक्षीस पत्रकार परिषदेत जाहीर केले.गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे जप्त२० हजार रु पयांची पिस्तूल, तीन काडतुसे, मालेगाव येथून चोरलेली ३० हजार रु पयांची दुचाकी, मोबाइल, रोख रक्कम असा एकूण ६५ हजार ६९० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला. त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर शस्त्र वापरल्याप्रकरणी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात येणार असून, त्याला लवकरच ठाणे पोलिसांकडे सोपविले जाणार आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयArrestअटक