नवी शेमळीच्या चेअरमनपदी सुशीला वाघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:46 IST2019-06-28T17:46:12+5:302019-06-28T17:46:49+5:30
जुनी शेमळी : नवी शेमळी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सुशीला प्रकाश वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोसायटीच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच महिला चेअरमनपदी गावाला मान मिळाला आहे.

नवी शेमळीच्या चेअरमनपदी सुशीला वाघ
सोसायटीच्या आवर्तनानुसार विलंचद वाघ यांंनी राजीनामा दिला होता. रिक्त जागेवर सुशीला वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नवनिर्वाचित चेअरमन वाघ यांनी संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी व सभासदांना कर्ज पुरवठा करण्यासाठी सर्व संचालकांना सोबत घेऊन सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी नवनिर्वाचित चेअरमन वाघ यांचा सत्कार करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक महेश भडांगे ,सचिव निंबा भाटेवाल यांनी कामकाज पाहिले. यावेळी शांताराम बधान, विलचंद वाघ, केवळ जाधव, यादव वाघ, प्रकाश वाघ,शिवाजी जाधव, नाना खांडेकर, संतोष खैरनार, रमेश वाघ, विश्वास वाघ,कडू वाघ, गणपत वाघ, दयाराम जाधव, सुभाष वाघ,संजय वाघ,अरु ण वाघ आदी उपस्थित होते.