पाथरे विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2019 17:49 IST2019-02-14T17:49:21+5:302019-02-14T17:49:34+5:30
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.

पाथरे विद्यालयात सूर्यनमस्कार स्पर्धा
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील भैरवनाथ हायस्कूल व एस. जी. कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून सूर्यनमस्कार दिन साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या उपशिक्षक मेधा शुक्ला यांनी सूर्यनमस्कार आणि रथसप्तमी दिनाचे महत्व विषद केले. रथसप्तमी हा सूर्याचा उपासनेचा दिवस आहे. या दिवशी सूर्याचे पूजन केले जाते. सूर्यनमस्कार दिनाच्या निमित्ताने विविध प्रकारचे व्यायाम विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. आजच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामाला कमी महत्व दिले जाते. त्यामुळे आयुर्मान कमी होत चालले आहे. यासाठी हे दिवस साजरे होणे आणि व्यायामाचा संकल्प करणे आवश्यक असल्याचे प्राचार्य सुनील गडाख यांनी यावेळी सांगितले. क्रीडाशिक्षक रमेश रौंदळ यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्काराचे प्रकार प्रत्यिक्षकाद्वारे करवून दाखवले आणि महत्व पटवून दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार केले आणि दररोज सकाळी सूर्यनमस्कार करण्याचा संकल्प केला.