सुर्य तळपला : नाशिकचे तपमान ३७.३ अंशावर
By Admin | Updated: March 22, 2017 20:48 IST2017-03-22T20:48:15+5:302017-03-22T20:48:15+5:30
नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून सूर्य तळपू लागल्याने बुधवारी कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला.

सुर्य तळपला : नाशिकचे तपमान ३७.३ अंशावर
नाशिक : नाशिककरांना उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत असून सूर्य तळपू लागल्याने बुधवारी कमाल तपमानाचा पारा संध्याकाळी साडेपाच वाजता ३७.३ अंशावर स्थिरावला. कमाल तपमानाचा या हंगामातील सर्वाधिक उच्चांक पेठरोडवरील हवामान खात्याच्या कार्यालयात नोंदविला गेला. गेल्या वर्षी २२मार्च रोजी ३७.८ अंश इतक्या कमाल तपमानाची नोंद ३७.८ अंश इतकी करण्यात आली होती. थंड हवामानाचे शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिककरांना गेल्या वर्षाप्रमाणेच यंदाही तीव्र उन्हाळ्याचा सामना करावा लागणार आहे.
बुधवारी सकाळपासूनच ऊन तापायला सुरूवात झाली होती. अकरा वाजेनंतर उन्हाचा कडक चटका शहरात जाणवत होता. यामुळे शहरातील कॉलन्या रस्त्यांसह प्रमुख रस्त्यांवरही शुकशुकाट पसरला होता. सायंकाळी सहा वाजेनंतर वाऱ्याचा वेग वाढल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला. नाशिककरांनी आल्हाददायक वातावरणाची अनुभूती घेण्यासाठी सुर्यास्तानंतर गोदापार्क, गोदाघाट, फाळकेस्मारक, पंडीत जवाहरलाल नेहरू वनोद्यान, सोमेश्वर धबधबा परिसरात गर्दी केली होती.