विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 23:22 IST2020-05-21T20:50:07+5:302020-05-21T23:22:34+5:30
अंदरसूल : येथे विहिरीत पडलेल्या काळविटाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. येथील दिनेश जनार्दन पागिरे यांच्या गट नं. ६२५ मधील शेतातील ५० फूट खोल असलेल्या विहिरीत काळवीट पडल्याचे पागिरे यांना आढळून आले.

विहिरीत पडलेल्या काळविटाला जीवदान
अंदरसूल : येथे विहिरीत पडलेल्या काळविटाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जीवदान दिले आहे. येथील दिनेश जनार्दन पागिरे
यांच्या गट नं. ६२५ मधील शेतातील ५० फूट खोल असलेल्या विहिरीत काळवीट पडल्याचे पागिरे यांना आढळून आले.
पागिरे यांनी तात्काळ याबाबत राजापूर वनविभागाला भ्रमणध्वनीवरून माहिती दिली. राजापूर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ५० फूट खोल असलेल्या विहिरीत वनरक्षक गोपाल हारगावकर हे दोराच्या साह्याने उतरले. त्यांनी विहिरीत पडलेल्या काळविटाला सुखरूप बाहेर
काढले. वनक्षेत्रपाल संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही
मोहीम राबविण्यात आली. यात वनपाल मोहन पवार, प्रसाद पाटील, ज्ञानेश्वर वाघ, सुनील भुुरूक, वाहनचालक यांनी मदत केली. दरम्यान, जीवदान मिळालेल्या काळविटाला वनविभाग कर्मचाऱ्यांनी पुन्हा अधिवासात सोडून दिले.